Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ जारी

पुढील 24 तासांत दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र, देशाच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर किंचित कमी होऊ शकतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 10, 2026 | 11:58 AM
अकोल्यात मुसळधार पावसाचा फटका; 24 घरांची पडझड तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

अकोल्यात मुसळधार पावसाचा फटका; 24 घरांची पडझड तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : सध्या वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यातच या मुसळधार पावसामुळे काही भागांमध्ये आपत्ती ओढवली असून, गुरुवारी देशभरात मोठ्या प्रमाणावर हाहा:कार उडाला आहे. अनेक राज्यांमध्ये पूर, भूस्खलन आणि इमारती कोसळल्याने गंभीर अपघात झाले आहेत. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असताना दिल्ली-एनसीआरमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली, जिथे इमारत कोसळल्याने आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.

देशाच्या दक्षिण भागासह गुजरातमध्येही मान्सूनचा कहर दिसून येत आहे. सुरत आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थितीमुळे हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांमध्ये आतापर्यंत नऊ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. उत्तर भारतातील डोंगराळ भागात, जम्मू आणि काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात ढगफुटीमुळे आलेल्या महापुराने पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान केले तर उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील नालुपाणीजवळ झालेल्या भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले असून, अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांना पूर आला आहे.

याव्यतिरिक्त, वीज पडण्याच्या इशाऱ्यामुळे हरियाणाच्या अनेक जिल्ह्यांमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परिस्थितीच्या गांभीर्याचा आढावा घेण्यासाठी केरळ, गुजरात आणि जम्मू आणि काश्मीरच्या मख्यमंत्र्यांशी फोनवर संवाद साधला.

मान्सूनने संपूर्ण देश व्यापला

गुरुवारी मान्सूनने संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे, तो ८ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो, पण यावेळी त्याला एक दिवस उशीर झाला आहे.

24 तासांचा अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र, देशाच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर किंचित कमी होऊ शकतो.

अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडीशा, मेघालय, केरळ आणि अन्य काही राज्यांना अटी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार वारे आणि वीजांचा कडकडाटासह पावसाचा इशारा दिला गेला आहे. अत्यंत वेगाने बारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना हवामान विभागाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Rain Alert : राज्यासह देशावर महाभयानक संकट येणार; अत्यंत वेगवान वारे अन्…, पाऊस झोडपणार

Web Title: Heavy rainfall in many states across the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • Climate Change
  • Heavy Rain
  • imd
  • Weather Update

संबंधित बातम्या

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा
1

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा

IMD Weather Alert: मान्सून जाता जाता पुन्हा बरसणार! देशभरात हवामान बदलले, कुठे अतिवृष्टी तर कुठे वादळी पावसाचा इशारा
2

IMD Weather Alert: मान्सून जाता जाता पुन्हा बरसणार! देशभरात हवामान बदलले, कुठे अतिवृष्टी तर कुठे वादळी पावसाचा इशारा

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
3

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
4

कोकणसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.