उत्तर भारतात (Western Air Disturbance in North India) पुन्हा एकदा पश्चिमी वाऱ्यांचा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे जम्मू काश्मीसह उत्तरेत अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामानाची स्थिती निर्माण (Rainy weather) झाली आहे. फेब्रुवारी महिना संपून मार्चला सुरुवात झाली तरीही देशात अद्याप अस्मानी संकट कायम आहे. पुढील पाच दिवस भारतीय (Possibility of Rainfall In India) समुद्रात वेगवान वारे वाहणार आहेत. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने (IMD) विविध ठिकाणी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
[read_also content=”मुंबई महापालिकेच्या चुकीच्या धोरणांमुळे शहरात अतिक्रमणाला मिळतंय खतपाणी, उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/high-court-worried-about-bmc-policy-of-slum-rehabilitation-and-encroachment-in-mumbai-nrsr-247424.html”]
आज दक्षिण अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर आणि गल्फ ऑफ मन्नारच्या परिसरात वादळी वारे वाहणार आहे. या वाऱ्यांचा वेग ४० ते ५० किमी प्रतितास इतका राहणार आहे. तसेच या वाऱ्यांचा वेग ६० किमी प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे. तर उद्या आणि परवा (३ मार्च) दक्षिण बंगालचा उपसागर, गल्फ ऑफ मन्नार आणि कमोरीन परिसरात वेगवान वारे वाहणार आहेत.
त्याचबरोबर ४ आणि ५ मार्च रोजी नैऋत्य आणि लगतच्या पश्चिममध्य बंगालचा उपसागर, मन्नारचं आखात, दक्षिण तामिळनाडूची किनारपट्टी आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीवर ४०-५० किमी प्रतितास ते ६० किमी प्रतितास वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित परिसरात मच्छीमारांना मासेमारे करण्यासाठी जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच खोल समुद्रात मासेमारी करायला गेलेल्या बोटींना परत बोलावून घेण्याचा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
तामिळनाडू, पुड्डुचेरी, कराईकल परिसरात ४ आणि ५ मार्च रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यानच्या कालावधीत रायलसीमा आणि आंध्र प्रदेशाच्या किनारी भागात देखील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार आहे. महाराष्ट्रात मात्र पुढील पाच दिवस कोणताही इशारा देण्यात आला नाही. पुढील पाचही दिवस राज्यात कोरडं हवामान राहणार आहे. तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानाची शक्यता आहे. पण कुठेही पावसाचा इशारा देण्यात आला नाही.