जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट! दहशतवाद्यांच्या IED हल्ल्याचा कट
मिळालेल्या माहितीनुसार, कोणताही संभाव्य धोका टाळण्यासाठी ही सतर्कता सर्व सुरक्षा यंत्रणा आणि सैन्याची तैनाती वाढवण्यात आली आहे. सुरक्षा दलांना त्यांच्या हालचाली मर्यादित ठेवण्याचे आणि बुलेटप्रूफ नसलेल्या वाहनांचा वापर टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून, आता केवळ बुलेटप्रूफ वाहनांमधूनच गस्त घालण्याचा आणि कारवाई करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त दक्षता घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
India Lockdown Again : भारत पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने? मोदींचं ‘ते’ वक्तव्य अन् …; काय आहे सत्य?
गुप्तचर माहितीमुळे, दहशतवादी आयईडी स्फोट आणि त्यानंतर अंदाधुंद गोळीबार करण्याची त्यांची पूर्वीची पद्धत पुन्हा वापरू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत, सुरक्षा दलांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आणि एसओपीनुसार (SOPs) कार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या, यंत्रणा संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई करण्यासाठी सतर्क आहेत.
याशिवाय, संभाव्य दहशतवादी धोक्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. काही संवेदनशील ठिकाणे निश्चित करून ‘शोधा आणि मारा’ (Spot and kill) मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जम्मू आणि काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराचे जवान या भागांमध्ये स्वतंत्रपणे किंवा संयुक्तपणे दहशतवादविरोधी कारवाया करत आहेत. महामार्ग आणि दुर्गम मार्गांवरही बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. या कारवायांमध्ये ड्रोन आणि स्निफर श्वानांनाही तैनात करण्यात आले आहे.
दहशतवादी संघटना आणि नक्षलवादी मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यासाठी आयईडीचा वापर करतात. यामध्ये अत्यंत स्फोटक आणि ज्वलनशील पदार्थ असतात, ज्यामुळे स्फोटानंतर लगेच आग लागते. आयईडी अनेकदा रस्त्याच्या कडेला किंवा पायवाटांवर लपवून ठेवलेले असतात आणि एखादी व्यक्ती किंवा वाहन त्यांच्या संपर्कात येताच त्यांचा स्फोट होऊ शकतो. ते रिमोट कंट्रोल किंवा इन्फ्रारेड ट्रिपवायरसारख्या साधनांनीही सक्रिय केले जाऊ शकतात. त्यानंतर होणाऱ्या स्फोटामुळे तीव्र ज्वाला आणि दाट धूर निर्माण होतो, ज्यामुळे नुकसान आणखी वाढते.






