हरियाणातील (Haryana) कर्नालमध्ये (Karnal) पिट बुल कुत्र्याने (PitBul Dog) एका तरुणावर हल्ला (Attack On Youth) केला. पिट बुलने 30 वर्षीय व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला चावा घेतला (Biten Private Part). त्यामुळे तरुणांची प्रकृती चिंताजनक आहे. कुत्र्याच्या तोंडात कापड टाकून तरुणाने जीव वाचवला. त्याचवेळी संतप्त लोकांनी पिटबुलला काठीने बेदम मारहाण केली.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नालच्या बिजना गावात राहणारा 30 वर्षीय करण गुरुवारी सकाळी आपल्या शेतात काम करत होता. गव्हाचा पेंढ्या तयार करण्यासाठी वापरलेले कापणी यंत्र शेतात उभे होते. ज्याखाली पिट बुल कुत्रा बसला होता. करण मशीनजवळ पोहोचताच बुलडॉगने लगेचच त्याच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला करत त्याचा लचकाच तोडला.
[read_also content=”बीबीसी इंडियावर परकीय चलन नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकरण: ईडीने खात्यांच्या व्यवहारांची माहिती मागितली, 2 महिन्यांपूर्वी IT ने केले होते सर्वेक्षण; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/business/shocking-news-ed-registers-fema-case-against-bbc-india-nrvb-384392.html”]
खूप प्रयत्न करूनही पिट बुलने तरुणाचा प्रायव्हेट पार्ट न सोडल्याने त्याने जवळच पडलेला कपडा कुत्र्याच्या तोंडात टाकला आणि बऱ्याच प्रयत्नांनंतरही त्याची कुत्र्यापासून सुटका झाली. मात्र तोपर्यंत तरुण गंभीर जखमी झाला होता.
तरुणाचा आरडाओरडा आजूबाजूच्या लोकांना कळताच तेही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी अवस्थेत तरुणाला तातडीने घारुंडा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक पाहून डॉक्टरांनी त्यांना कर्नाल येथील शासकीय रुग्णालयात रेफर केले. यादरम्यान हा तरुण अनेक तास बेशुद्ध अवस्थेतच होता. सध्याही तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर कर्नाल येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
[read_also content=”आजचं राशीभविष्य, १३ एप्रिल २०२३, असा आहे आजचा दिवस https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-13-april-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
गेल्या आठवडाभरापासून हा कुत्रा गावात फिरत असल्याचे पीडित व्यक्तीच्या नातेवाईकांनी सांगितले. 2 दिवसांपूर्वीही एका व्यक्तीवर हल्ला झाला होता.आलम अशी झाली आहे की आता गावकरी घराबाहेर पडायला घाबरत आहेत. अशा स्थितीत सर्व गावकऱ्यांनी निर्णय घेऊन या कुत्र्याला काठीने बेदम मारहाण केली. तो राणा नावाच्या व्यक्तीचा कुत्रा असल्याचे सांगितले.
या प्रकरणाची माहिती पोलिसांनाही देण्यात आली आहे. जेणेकरून कुत्र्याच्या मालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल. माहिती मिळताच पोलिसांनी कल्पना चावला मेडिकल कॉलेज, कर्नाल गाठले, तेथे जखमी तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवून पुढील कारवाई सुरू आहे.