पहलगाम हल्ल्यानंतर भारत आक्रमक (फोटो- सोशल मिडिया)
नवी दिल्ली: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. पर्यटकांवर त्यांनी क्रूर हल्ला केला. यामध्ये 28 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली आहे. तर काल सर्व पक्षांची एक बैठक देखील सरकारने घेतली आहे. मात्र आता भारतीय वायुसेना अॅक्शन मोडमध्ये आलेली आहे. भारतीय वायुसेनेने ‘आक्रमण’ ऑपरेशन ड्रिल केले आहे.
‘आक्रमण’ ड्रिलमध्ये भारतीय वायुसेनेच्या सर्वात अत्याधुनिक अशा राफेल जेट्सच्या नेतृत्वात आघाडीच्या लढाऊ ताफ्याचे प्रदर्शन करण्यात आले. भारतीय हवाई दलाकडे हरियाणातील अंबाला आणि पश्चिम बंगालमधील हशिमारा येथे दोन राफेल स्क्वॉड्रन तैनात आहेत. ही अत्याधुनिक विमाने सध्या सुरू असलेल्या सरावाच्या केंद्रस्थानी असल्याचे पाहायला मिळाले.
सुरक्षा विभागाशी संबंधित सूत्रांनी एका वृत्तवाहिणीशी संवाद साधतान याबाबत माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय वायुसेनेने आपली अनेक संसाधने सेंट्रल सेक्टरमध्ये नेण्यात आली आहेत. भारतीय वायुसेना सपाट आणि डोंगराळ प्रदेशासह विविध परिस्थितींमध्ये सराव करत आहे. हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि रॅम्पेज आणि रॉक्स सारख्या लांब पल्ल्याच्या अचूक स्ट्राइक सिस्टीमसह भारतीय वायुसेनेने दक्षिण आशियाई प्रदेशात आपली ताकद वाढवली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा ‘आक्रमण’ सराव होत असल्याने पाकिस्तानची चिंता वाढली आहे.
२०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या हवाई हल्ल्यात भारतीय वायुसेनेने क्षमता दाखवली होती. पाकिस्तानमध्ये घुसून अचूक हल्ले करण्यासाठी मिराज २००० जेट विमाने वापरण्यात आली होती. आता राफेल जेट्सच्या समावेशामुळे भारतीय वायुसेनेची ताकद अधिक वाढली आहे. भारतीय हवाई दलाने S-400 हवाई संरक्षण प्रणालीसारखे नवीन फोर्स मल्टीप्लायर्स देखील आपल्या ताफ्यात दाखल केले आहेत , जे शत्रूच्या हवाई हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहेत.
सिंधु जल करारा’ला स्थगिती देताच भारत अॅक्शन मोडमध्ये
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात 28 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांना ठार मारण्यात आले. या हल्ल्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान भारताने आता पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखले आहे. त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक, ओद्योगीक कोंडी होणार आहे.
Pahalgam Terror Attack: ‘सिंधु जल करारा’ला स्थगिती देताच भारत अॅक्शन मोडमध्ये; ‘चिनाब’चे पाणी रोखले
भारताने पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखले आहे. चिनाब नदीवरील असणाऱ्या धरणातून पाकिस्तानला पाणीपुरवठा होत असते. भारताने चिनाब नदीचे पाणी रोखले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला एक थेंब देखील पाणी भारताकडून मिळणार नाहीये. याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.