
भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘मंगरोल’ युद्धनौका दाखल; सागरी सुरक्षेला मिळणार बळ
मोठी बातमी ! तांदळाची निर्यात आता लवकरच थांबणार; किरकोळ किमतीत 10 टक्क्यांची वाढ
आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज
‘मंगरोल’ युद्धनौका प्रगत शस्त्रास्त्रे आणि सैन्सर प्रणालीनी सज्ज आहे. यामध्ये’ अभय’ हुल-माउंटेड सोनार, हलके टॉर्पडी, स्वदेशी पाणबुडीविरोधी रॉकेट प्रक्षेपक आणि ‘मारीच’ ही प्रगत टॉपेंडो डिकॉय प्रणाली यांचा समावेश आहे. या उपकरणांच्या मदतीने शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेऊन त्यांच्यापासून निर्माण होणारा धोका कमी करता येणार आहे. ही युद्धनौका सागरी गस्ती विमाने, हेलिकॉप्टर आणि अन्य युद्धनौकाशी समन्वय साधून काम करू शकते. पाण्याखालील निगराणी, कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमा आणि सागरी सुरुंगांशी संबंधित मोहिमांमध्येही तिचा वापर करता येईल. तीन डिझेल इंजिन आणि वॉटरजेट प्रणोदन प्रणालीमुळे ‘मंगरोल’ उथळ समुद्रात वेगाने दिशा बदलून प्रभावी हालचाली करू शकते.
Form 6 Controversy : बदललेल्या फॉर्म-6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही; न्यायालयाचा स्पष्ट खुलासा
स्वदेशी नौका निर्मितीला बळ
या युद्धनौकेच्या निर्मितीत ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे, त्यामुळे भारताची युद्धनौका बांधणी आणि आधुनिक संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता अधोरेखित झाली आहे. गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील मंगरोल या किनारी शहरावरून युद्धनौकेचे नामकरण करण्यात आले आहे. ही नौका पूर्वीच्या आयएनएस मंगरोलचा वारसा पुढे चालवते. पूर्वीच्या नौकेने एप्रिल २००४ पर्यंत भारतीय नौदलात सेवा बजावली होती, ‘मंगरोल’ च्या समावेशामुळे देशाच्या किनारी सागरी सुरक्षेला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.