सांगली- कोल्हापूरला पुराचा धोका निर्माण होणार? (फोटो- टीम नवराष्ट्र/सोशल मिडिया)
Maharashtra & Karanataka: महाराष्ट्रात पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी महापुराच्या घटना घडतात. त्यातीलच पश्चिम महराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना देखील महापुराचा फटका बसतो. पश्चिम महाराष्ट्रात जी महापूरची स्थिति निर्माण होते त्याला कर्नाटक सरकार जबाबदार असल्याचे म्हटले जाते. म्हणजेच कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापूरला पुराचा फटका बसतो असे आरोप केले जातात. सध्या या धरणाची ऊंची 519 मीटर इतकी आहे. मात्र आता कर्नाटक सरकारने या धरणाची ऊंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सांगली-कोल्हापूरवर महापूरचे संकट वाढण्याची शक्यता आहे.
अलमट्टी धरणाची ऊंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकारने केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. धरणाची ऊंची 5 मीटरने वाढवण्यासाठी ही परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाल्यास सांगली-कोल्हापूरला पुराचा धोका वाढणार आहे. मुसळधार पाऊस आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला की सांगली-कोल्हापूरला पुराचा धोका निर्माण होतो.
सध्या बेळगावमध्ये कानर्तक सरकारचे विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अलमट्टी धरणाची ऊंची वाढवण्यासाठी मागणी केली आहे. त्यासाठी आज बैठकी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सत्ताधारी कॉँग्रेस आणि विरोधात असलेल्या भाजपने देखील या मागणीला पाठिंबा दर्शवला असल्याचे समजते आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडे दोन्ही राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र या मागणीमुळे कृष्णा नदीच्या पाण्याचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: कर्नाटक काही ऐकेना! महाराष्ट्र सरकारचा विरोध न जुमानता आता अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय
महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्याच्या स्थापनेपासूनच तिन्ही राज्यांत कृष्ण नदीच्या पाण्यावरून वाद असल्याचे पाहीला मिळाले. हा वाद सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडून 1969 मध्ये कृष्णा पाणी तंटा लवादाची स्थापन करण्यात आली. ज्यानुसार तिन्ही राज्यांना अनुक्रमे 585 टीएमसी, 731 टीएमसी आणि 811 टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले. पाणी अडवण्यासाठी तिन्ही राज्याना धरणे आणि कालवे बांधण्यासाठी सांगण्यात आले.
कर्नाटक सरकारला अलमट्टी धरणाची ऊंची 5 मीटरने वाढवायची आहे. असे करून त्यांना शेती सिंचनाखाली आणायची आहे. त्यासाठी केंद्रीय लवादाने कर्नाटकला धरणाची ऊंची 5 मीटरने वाढवण्यास परवानगी दिली आहे. जर का ही ऊंची वाढवण्याची परवानगी मिळाली तर सांगली कोल्हापूरमध्ये महापुराचा धोका मोठ्या प्रमाणात वधू शकतो.
सांगली-कोल्हापूर शहराला वारंवार महापुराचा फटका बसतो. 2005,2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापुरामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या महापुराला यासाठी कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यातील अलमट्टी धरण जबाबदार असल्याचा आरोप होतो. अलमट्टी धरणातून पानी न सोडण्यात आल्याने कृष्णा नदीच्या पाण्याचा फुगवटा वाढून सांगली कोल्हापूरमध्ये पुरस्थिती निर्माण होत असल्याचे महाराष्ट्र सरकारचे म्हणणे आहे. कृष्णा नदी महाराष्ट्रसाठी तसेच सांगली-कोल्हापूरसाठी जीवनवाहिनी आहे. मात्र हीच कृष्णा माई अनेकदा कोपल्याचे पाहायला मिळते. कर्नाटक सरकारला धरणाची ऊंची वाढवण्याची परवानगी मिळाली तर या दोन जिल्ह्यांना महापुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. मात्र हे रोखणीसाठी आता महाराष्ट्र सरकार कोणती पावले उचलणार हे पहावे लागणार आहे.