देशाच्या राजधानी कर्तव्य पथाच्या रुपात आज एक नवी ओळख मिळणार आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट अंतर्गत नवीन संसद भवना बरोबरच राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटकडे जाणाऱ्या 3 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला आजपासून कर्तव्यपथ नावाने ओळखण्यात येणार आहे. आज पंतप्रधानांच्या हस्ते यांच उद्घाटन होणार आहे. राजपथ ते कर्तव्यपथ हा बदल कसा झाल ते पाहुया.
राजपथ नाव मिळण्यापुर्वी स्वातंत्र्यापूर्व काळात राजपथ हा किंग्स वे आणि जनपथ क्वींस वे नावानं ओळखला जात होता. स्वातंत्र्यानंतर क्वींस वे चं नाव बदलून जनपथ असं करण्यात आलं. तर किंग्स वे राजपथ म्हणून ओळखला जाऊ लागला. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता त्याचं नाव बदलून कर्तव्य पथ असं करण्यात आलं आहे. केंद्र सरकार मानते की राजपथ हा राजाच्या कल्पनेला प्रतिबिंबित करतो, जो शासितांवर राज्य करतो. तर लोकशाही भारतात जनताच सर्वोच्च आहे. नाव बदल हे मोठ्या प्रमाणावर वर्चस्व आणि त्याच्या सक्षमीकरणाचं उदाहरण आहे.
कर्तव्य पाथ परिसरात सुंदर लॉन, हिरवीगार जागा, नूतनीकरण केलेले कालवे, रस्त्यांच्या कडेला चांगले फलक, नवीन सुविधा असलेले ब्लॉक असतील. तर. अधिक विक्री स्टॉल. याशिवाय पादचाऱ्यांसाठी नवीन मार्ग, पार्किंगसाठी चांगली जागा, नवे प्रदर्शन फलक आणि रात्रीचे आधुनिक दिवे यामुळे लोकांना चांगला अनुभव मिळेल. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, अतिवृष्टीमुळे जमा झालेल्या पाण्याचं व्यवस्थापन, वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर, जलसंवर्धन आणि ऊर्जा कार्यक्षम प्रकाशयोजना अशा अनेक शाश्वत सुविधांचा समावेश आहे.
नवी दिल्ली महानगर कॅान्सिलच्या (NDMC) ने बुधवारी राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॅानचं कर्तव्य पाथ असं नामांतर करण्यात आला. यासंदर्भात झालेल्या एनडीएमसीच्या विशेष सभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. विजय चौक ते इंडिया गेट पर्यंतचा राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉन NDMC च्या अखत्यारीत येतात. केंद्र सरकारची विविध मंत्रालये, विभाग, कार्यालये येथे आहेत. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. ते म्हणाले की एनडीएमसीला गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडून राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलण्याबाबत अर्ज प्राप्त झाली होता. दरम्यान, NDMC ने लोकशाही व्यवस्था, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक मूल्ये लक्षात घेऊन एकमताने हा प्रस्ताव मंजूर केला. लोककल्याण आणि राष्ट्रीय विकासासाठी कर्तव्ये अंगीकारण्यासाठी प्रेरणा देणे आणि लोकशाही राष्ट्राच्या थीम आणि मूल्यांवर या प्रदेशाचा संपूर्ण वसाहतवादी इतिहास बदलणे हा त्यामागील हेतू आहे. त्यांनी राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलून कर्तव्य पथ करण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे.