
कोलकात्यात भीषण अपघात; बांधकाम सुरू असलेले गोदाम कोसळले, 50 जण मलब्याखाली अडकल्याची शक्यता
घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ताराताला परिसरातील ब्रेस ब्रिजजवळ ट्रान्सपोर्ट डेपो रोडवर बांधकाम सुरू होते. बुधवारी दुपारी, कामगार नेहमीप्रमाणे काम करत असताना, छताचा एक मोठा भाग अचानक कोसळला. या प्रचंड ढिगाऱ्यामुळे सर्वत्र घबराट पसरली.
धर्मेंद्र प्रधान यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला म्हटलं देशद्रोही; आता पुन्हा वादळ उठणार?
कोलकाता पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत चार जणांना बाहेर काढण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, कोलकाता पोलीस, आपत्ती व्यवस्थापन गट, नागरी संरक्षण दल, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांची पथके घटनास्थळी सतत बचावकार्यात गुंतलेली आहेत. भारतीय लष्कराचे जवानही मदतकार्यात साहाय्य करत आहेत. कोसळलेले लोखंडी बीम आणि ढिगारा हटवण्यासाठी अवजड क्रेन आणि इतर यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे, तर कोसळलेले लोखंडी बीम हटवण्यासाठी क्रेन आणि अवजड उचलणारी यंत्रसामग्री तैनात करण्यात आली होती.
कोलकाता पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत १० जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. त्या सर्वांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात ब्रेस ब्रिजजवळ दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इमारत कोसळत असताना ढिगाऱ्याखालून लोकांच्या किंकाळ्या आणि मदतीसाठी याचना ऐकू आल्या. अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथक प्रयत्न करत आहे.
मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे. कोलकाता पोलीस, आपत्ती व्यवस्थापन गट (डीएमजी), नागरी संरक्षण दल आणि अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. लष्करी अधिकारीही बचावकार्यात मदत करत आहेत. लोखंडी बीम आणि काँक्रीट कापण्यासाठी गॅस कटर आणि व्हर्टिकल ड्रिलिंग मशीनचा वापर केला जात आहे. मोठा मलबा हटवण्यासाठी क्रेन आणि अवजड यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे.
अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने आरोप केला आहे की, गोदामाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात होते. दरम्यान, स्थानिक रहिवाशांनी तक्रार केली आहे की, गेल्या काही काळापासून या परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकाम सुरू आहे.
या भीषण अपघातानंतर राज्य सरकार पूर्णपणे सतर्क झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन गटाने मदतकार्यावर देखरेख ठेवण्यासाठी आणि पीडितांना मदत करण्यासाठी राज्य सचिवालयात विशेष नियंत्रण कक्ष क्रमांक जारी केले आहेत. नागरिक आपत्कालीन परिस्थितीत १०७०, ८६९७९८१०७०, आणि ०३३-२२१४३५२६ / २२५३५१८५ या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात.