Kuno National Park मधील चित्ताचा गोळीबारात मृत्यू? CBI चौकशीची मागणी, सौजन्य : एआयएनएस
चित्ताच्या सुरक्षेच्या बेजबाबदारपणावर आरोप लावताना वन्यजीव कार्यकर्ता अजय दुबे यांनी घटनेची CBI तसापणी करण्याची मागणी केली आहे. कुनोचे फिल्ड डायरेक्टर उत्तम शर्मा, डीएफओ थिरू आणि एसडीओ अमृतांशु यांना तातडीने पदावरून हटवावे अशी दुबे यांनी मागणी करताना वन विभागाला प्राण्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यास अपयशी राहिल्याबाबत जबाबदारही ठरवण्यात आले आहे.
दुबे म्हणाले की, मी अनेक वर्षांपासून या धोक्याचा इशारा दिला होता, पण मध्य प्रदेश सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. कुनो फिल्ड डायरेक्टरवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. या संशयास्पद गोळीबार व चित्ताच्या मृत्यूप्रकरणी मी CBI ची मागणी केली आहे.
मादा चित्ता निर्वा हिच्या पिल्लूपैकी एक असलेला नर चित्ता 25 ऑक्टोबरच्या संध्याकाळी श्योपुरच्या जवळ असलेल्या मोरेना जिल्ह्याच्या प्रादेशिक वन विभागातून जात असताना तो पेट्रोलिंग पथकाला गंभीर जखमी अवस्थेत आढळला.
त्याचा जीव वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले. प्राथमिक उपचारासाठी त्याला कुनोला आणण्यात आले. नंतर त्याला पुढील उपचारासाठी जबलपुरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. नर चित्ताच्या पोटात तीन ते चार धातुच्या गोळ्या आढळल्या. सुत्रांच्या मते, विशेष उपचारासाठी नेल्यानंतरही त्या प्राण्याचे प्राण वाचू शकले नाही.
Narendra Modi : अन् अचानक पंतप्रधान मोदी म्हणाले, योगीजींचे आभार माना
या घटनेने संरक्षित परिसरातून बाहेर पडणाऱ्या या मोठ्या जंगली प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. तसेच देशातील ‘चित्ता संरक्षण कार्यक्रमा’समोर एक मोठे आव्हान उभं राहिले आहे. अधिकारी म्हणाले की, या परिसरात वन्यजीव सुरक्षेसाठी साकारण्यात आलेले विशेष पथक, स्पेशल टायगर स्ट्राइक फोर्स (एसटीएसएफ)ला तैनात करण्यात आले आहे.
तपासकर्ते या गोष्टीचा शोध घेत आहेत की, या प्राण्याला पारंपारिक ‘भरमार’ (मजल-लोडिंग बंदूक) मधून गोळी मारण्यात आली आहे, अथवा एखाद्या देशी 12-बोर बंदुकीचा वापर झाला आहे. फॉरेंसिक आणि बॅलेस्टिक तपासातून वापर करण्यात आलेल्या शस्त्राचा प्रकाराचा शोध घेणे व तपासात मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
Ans: मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान परिसरात मादी चित्ता निर्वाच्या १९ महिन्यांच्या पिल्लाचा मृत्यू झाला. त्याच्या पोटात तीन ते चार धातूचे छर्रे आढळल्याचे वृत्त आहे.
Ans: चित्त्याच्या शरीरात धातूचे छर्रे आढळल्याने गोळीबाराचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे.
Ans: वन्यजीव कार्यकर्ते अजय दुबे यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.






