Ladli Behna Scheme:'२०२८ पर्यंत लाडली बहनाला ३००० रुपये देणार'; मुख्यमंत्र्यांचे मोठं विधान
Ladli Behna Scheme: २०२८ पर्यंत महिलांना लाडली बहन योजनेअंतर्गत दरमहा ३००० रुपये दिले जातील,अशी घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना त्यांनी या योजनेबाबत भाष्य करताना काँग्रेसवरही निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, “जेव्हा आम्ही ही योजना सुरू केली, तेव्हा काँग्रेसकडून सतत गोंधळ घालण्यात आला. ते म्हणत होते ही योजना फक्त निवडणुकीसाठी आहे, सरकारकडे पैसे नाहीत. पण आम्ही आमच्या वचनावर ठाम राहिलो.”
मोहन यादव म्हणाले, “सुरुवातीला महिलांना दरमहा १००० रुपये दिले गेले, नंतर रक्कम १२५० रुपये करण्यात आली, यावर्षी श्रावण महिन्यापासून योजनेची रक्कम १५०० रुपये करण्यात आली, आणि या दिवाळीपासून भाऊबीज नंतर महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. लाडली बहन योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम टप्प्याटप्प्याने वाढवत ती ५००० रुपयांपर्यंत नेण्यात येईल. असंही त्यांनी यावेळी नमुद केलं.
अनेक राज्यांमध्ये भीषण पुरस्थिती अन् PM Narendra Modi ॲक्शन मोडमध्ये; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
काँग्रेसवर निशाणा साधत मोहन यादव म्हणाले, “काँग्रेसच्या राजवटीत महिलांसाठी एकही पैसा नव्हता, ही त्यांची चूक आहे. त्यांनी स्वतःकडे पाहावे. आम्हाला आमच्या बहिणींवर विश्वास आहे. ३००० रुपये सोडाच, जर त्या काम करतील तर आम्ही त्यांना त्यापेक्षा कितीतरी पट जास्त देऊ. ही आमची वचनबद्धता आहे. मुख्यमंत्री यादव यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले की, २०२८ पूर्वी लाडली बहन योजनेतून महिलांना दरमहा ३००० रुपये मिळणारच.” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री यादव म्हणाले की आज जर आमची लाडली बहीण भोपाळमध्ये रेडीमेड कपड्यांमध्ये काम करायला गेली तर ती त्यांच्या सरकारमार्फत ८ तास काम करेल. ती १००००-१२००० कमवेल. त्यात या वर्षांपासून अतिरिक्त ५००० रुपये दिले जातील जेणेकरून आमच्या बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील आणि स्वावलंबी होऊ शकतील. सरकार यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. राज्यातील अर्ध्या लोकसंख्येची काळजी घेणे हे आमचे काम आहे. महिलांचे हित लक्षात घेऊन आम्ही या दिशेने पुढे काम करत आहोत.
मोहन यादव म्हणाले की, लाडली बहिणींचा एक चांगला सर्वेक्षण झाला आहे. आयआयटीच्या एका चांगल्या विद्यार्थ्याने त्यावर संशोधन केले आहे. ज्या ज्या ठिकाणी लाडकी बहिणींच्या जितकी रक्कम दिली गेली, त्या ठिकाणी तिथे मुलांच्या आरोग्याबाबत, शिक्षणाबाबत घराच्या वातावरणात बदल झाला. बहिणी त्यांच्या पैशाचा चांगला वापर करत आहेत, ते संपूर्ण देशात एक उदाहरण बनले आहे, म्हणून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आमच्या लाडली बहिणींना मदत केल्याबद्दल आभार मानू इच्छितो.
लाडली बहीण योजनेत २०२३ नंतर नवीन नावे न जोडल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, “आमच्या सरकारने तब्बल १ कोटी २९ लाख बहिणींची नोंदणी केली आहे. त्या काळात आलेल्या सर्व अर्जदारांचा समावेश झाला होता. आता पुन्हा आढावा घेतल्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांची नावेही जोडली जातील. आम्ही कोणालाही सोडणार नाही.”
मुख्यमंत्री यादव यांनी पुढे सांगितले की, “आम्ही फक्त भत्ता देत नाही आहोत, तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ बनवत आहोत. राज्यातील ४० लाखांहून अधिक बचत गटांच्या माध्यमातून लाखपती बहिणी घडवत आहोत. काही ठिकाणी ‘लखपती ड्रोन दीदी’ही तयार होत आहेत. दरमहा १०,००० रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवणे म्हणजे खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम बनवणे. लाडली बहना योजनेसोबतच महिलांना उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध करून देणे हा सरकारचा उद्देश आहे. असंही त्यांनी अधोरेखित केलं.