नवी दिल्ली : देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानंतरचे दुसऱ्या क्रमाकांचे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यात माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना पद्मविभूषण तर माजी केंद्रीयमंत्री राम नाईक यांना पद्मभूषण मिळाला आहे.
कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, सनदी सेवा, व्यापार आणि उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवर पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहेत. पाच पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या यादीत 30 महिलांचा समावेश आहे. एकूण 132 पैकी महाराष्ट्रातील 12 मान्यवरांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत.
कोणा-कोणाला जाहीर झाला पद्मविभूषण?
के. चिरंजीवी (कला / आंध्र प्रदेश), वैजयंतीमाला बाली (कला / तमिळनाडू), एम. व्यंकय्या नायडू (राजकीय नेते / आंध्र प्रदेश), बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर) (समाजसेवा / बिहार), पी. सुब्रह्मण्यम (कला / तमिळनाडू)
महाराष्ट्रातील पद्मभूषणचे मानकरी
राम नाईक (सार्वजनिक व्यवहार / महाराष्ट्र), दत्तात्रय अंबादास राजदत्त (कला / महाराष्ट्र), प्यारेलाल शर्मा (कला / महाराष्ट्र), कुंदन व्यास (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता / महाराष्ट्र), हॉर्मुसजी एन. कामा (साहित्य व पत्रकारिता / महाराष्ट्र), अश्विन बालचंद मेहता (मेडिसीन / महाराष्ट्र).






