मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी दिला राजीनामा (फोटो- ट्विटर)
Manipur Chief Minister Resign: मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी मणीपुरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे सुपूर्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर एन. बिरेन सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. एन. बिरेन सिंग यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सोपवला आहे. गेल्या दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
Manipur CM N Biren Singh hands over the letter of resignation from the post of Chief Minister to Governor Ajay Kumar Bhalla at the Raj Bhavan in Imphal. pic.twitter.com/zcfGNVdPPo
— ANI (@ANI) February 9, 2025
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी गेल्या वर्षीच्या अखेरीस मणिपूरच्या जनतेची माफी मागितली होती. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसचाराबद्दल त्यांनी जनतेची माफी मागितली होती. हे संपूर्ण वर्ष वाईट पद्धतीने गेले. गेल्या वर्षी 3 मे पासून राज्यात जे काही घडले त्याबद्दल मी राज्यातील जनतेची माफी मगतो. राज्यातील अनेक कुटुंबांनी आपल्या परिवारातील सदस्यांना गमावले आहे. गेल्या तीन चार महिन्यांपासून राज्यात शांततापूर्ण वातावरण आहे. 2025 मध्ये राज्य पूर्वपदावर येईल अशी अशा मला आहे, असे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग म्हणाले.
राज्यातील जनतेची सेवा करणे हाच माझ्यासाठी मोठा सन्मान असल्याचे एन बिरेन सिंग म्हणाले. केंद्र सरकारने राज्यात वेळेवर कारवाई केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. मणिपूरमध्ये अशाच प्रकारे विकासाची कामे सुरू राहावी अशी विनंती मी केंद्र सरकारला करतो, असे राजीनामा दिल्यानंतर एन बिरेन सिंग म्हणाले.
एन बिरेन सिंग यांच्याविरुद्ध भाजपमध्ये नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. एन बिरेन सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर थोड्याच वेळात भाजपच्या विधिमंडळ गटाची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत विधिमंडळ गटाचा नेता म्हणजेच मणिपूरचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधिमंडळ गटाने नेता ठरवल्यावर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा केली जाणार आहे.
दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार
गेल्या दोन वर्षांपासून मणिपूर अशांत होते. हिंसाचार सुरू होता. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात शांततेचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यात मेईतेई आणि कुकी समाजात तणाव वाढल्या काही ठिकाणी हिंसक घटना देखील घडल्या. शेकडो लोकांना प्राण गमवावे लागेल. अनेक कुटुंबे बेघर झाली. अनेकांनी आपल्या परिवारातील सदस्याला गमावले. तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने अतिरिक्त सुरक्षा दले माणिपूरमध्ये तैनात केली होती. मणिपूरमधील हिंसचारावरून देशभरातून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका होत होती.