Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संरक्षण मंत्रालयाच्या ऑफिशियल पत्रात नेमकं लिहिलं काय? गृहमंत्री अमित शाहांनी केलं लष्कराचे कौतुक

पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताकडून ऑपरेशन सिंदूर करण्यात आले. यामध्ये 9 दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. यावर अमित शाह आणि केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 07, 2025 | 11:38 AM
Ministry of Defense and Union Home Minister Amit Shah's reaction to Operation Sindoor

Ministry of Defense and Union Home Minister Amit Shah's reaction to Operation Sindoor

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम या पर्यटन स्थळावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. 22 एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यामध्ये 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर देशभरातून रोष व्यक्त करण्यात येत होता. भारताने पाकिस्तानावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती. अखेर भारताने पाकिस्तानकडून बदला घेतला आहे. ऑपरेशन सिंदूर करुन पाकिस्तानातील 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केला आहे. भारताने पाकिस्तान अधिकृत जम्मू-कश्मीरमधील मुजफ्फराबाद, कोटली, गुलपुर, बिंबर आणि सियालकोट, चक अमरू, मुरीदके, बहावलपूर अशा 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रात्री दीड वाजण्याच्या सुमारास भारताकडून ऑपरेशन सिंदूर करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री वॉर रुममधून याचे पूर्ण प्रक्षेपण पाहिले. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन भारतीय लष्करी दल, हवाई दलाचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे. इतर केंद्रीय नेत्यांनी देखील या प्रतिहल्ल्यावरुन भारतीय सेनेचे कौतुक केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. ऑपरेशनसिंदूर हे पहलगाममध्ये आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेले प्रत्युत्तर आहे. भारत आणि त्याच्या लोकांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला योग्य उत्तर देण्याचा मोदी सरकारचा निर्धार आहे. भारत दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी दृढनिश्चयी आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Proud of our armed forces.#OperationSindoor is Bharat’s response to the brutal killing of our innocent brothers in Pahalgam. The Modi government is resolved to give a befitting response to any attack on India and its people. Bharat remains firmly committed to eradicating… — Amit Shah (@AmitShah) May 7, 2025

ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या झाल्यानंतर संरक्षण दलाकडून ऑफिशियल प्रेस रिलिज काढण्यात आले. यामध्ये लिहिण्यात आले की, ऑपरेशन सिंदूर: भारतीय सशस्त्र दलांनी दहशतवादी छावण्यांवर अचूक हल्ला केला. भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर हल्ला करण्यात आला जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले नियोजित आणि निर्देशित केले गेले होते. एकूण नऊ (९) स्थळांना लक्ष्य करण्यात आले आहे.

ऑपरेशन सिंदूरबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा 

आमच्या कृती केंद्रित, मोजमापित आणि निसर्गात वाढत्या नाहीत. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष्य करण्यात आले नाही. लक्ष्यांची निवड आणि अंमलबजावणीच्या पद्धतीत भारताने बराच संयम दाखवला आहे. पहलगाम येथील बर्बर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही पावले उचलण्यात आली आहेत ज्यामध्ये २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाची हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरले जाईल या वचनबद्धतेचे आम्ही पालन करत आहोत, असे भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

Web Title: Ministry of defense and union home minister amit shahs reaction to operation sindoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2025 | 11:38 AM

Topics:  

  • Amit Shah
  • narendra modi
  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

Amit Shah: “हे नरेंद्र मोदींचे सरकार आहे, शस्त्र उचलणाऱ्यांचा हिशोब चुकता होईल”; अमित शाह यांचा नक्षलवादावर लोकसभेत कडक प्रहार
1

Amit Shah: “हे नरेंद्र मोदींचे सरकार आहे, शस्त्र उचलणाऱ्यांचा हिशोब चुकता होईल”; अमित शाह यांचा नक्षलवादावर लोकसभेत कडक प्रहार

Karjat News : “चीन घुसखोरी करताना मोदींची 56 इंच छाती जाते कुठे?” राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची सणसणीत टीका
2

Karjat News : “चीन घुसखोरी करताना मोदींची 56 इंच छाती जाते कुठे?” राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची सणसणीत टीका

Amit Shah : ममता सरकारविरोधात भाजपचे आरोपपत्र दाखल, अमित शाह म्हणाले, “बंगालच्या सीमेवरून येणारे घुसखोर, ही चिंतेची बाब…”
3

Amit Shah : ममता सरकारविरोधात भाजपचे आरोपपत्र दाखल, अमित शाह म्हणाले, “बंगालच्या सीमेवरून येणारे घुसखोर, ही चिंतेची बाब…”

भाजपचे चाणक्य उतरणार मैदानात; ममता बॅनर्जींविरोधात दाखल करणार खळबळजनक चार्जशीट
4

भाजपचे चाणक्य उतरणार मैदानात; ममता बॅनर्जींविरोधात दाखल करणार खळबळजनक चार्जशीट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.