भारताने पाकिस्तानावर केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम या पर्यटन स्थळावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. 22 एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यामध्ये 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर देशभरातून रोष व्यक्त करण्यात येत होता. भारताने पाकिस्तानावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती. अखेर भारताने पाकिस्तानकडून बदला घेतला आहे. ऑपरेशन सिंदूर करुनपाकिस्तानातील 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केला आहे. भारताने पाकिस्तान अधिकृत जम्मू-कश्मीरमधील मुजफ्फराबाद, कोटली, गुलपुर, बिंबर आणि सियालकोट, चक अमरू, मुरीदके, बहावलपूर अशा 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केला. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला 14 दिवसांनंतर घेतला आहे. सियालकोट हा भारत आणि पाकिस्तान सिमेवरील दहशतीचा अड्डा आहे. या भागाला दहशतवादी हालचालींचे केंद्र असे म्हटले जाते. हे उद्धवस्त केले आहे. सिंदूर ऑपरेशनमध्ये मध्यरात्री दीड वाजता भारतीय हवाई दलाच्या राफेल आणि जेट्स विमानांनी नऊ ठिकाणे उद्धवस्त केली आहेत. यावर महाराष्ट्रातील नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पहिल्यांदा मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी अभिनंदन करतो. जे पर्यटन स्थळ ठिकाणी गेले होते लाडक्या बहिणीचं कुंकू पुसण्याचा काम गोळ्या घालून हत्या केलं. माणुसकीला काळीमा पासून काम केलं. त्यांना दहशतवादांना आणि पाकला जशास तसे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑपरेशनच्या माध्यमातून दिले आहे. कुंकू पुसण्याचा पाप केलं त्यांना धडा शिकवला आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
ऑपरेशन सिंदूर बद्दल अपडेट जाणून घ्या
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील सोशल मीडिया पोस्ट करुन भारतीय लष्कराने कौतुक केले आहे. अमित शाह यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की,आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. ऑपरेशनसिंदूर हे पहलगाममध्ये आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेले प्रत्युत्तर आहे. भारत आणि त्याच्या लोकांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला योग्य उत्तर देण्याचा मोदी सरकारचा निर्धार आहे. दहशतवाद मुळापासून नष्ट करण्यासाठी भारत दृढपणे वचनबद्ध आहे, अशा भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केल्या आहेत.
Proud of our armed forces.#OperationSindoor is Bharat’s response to the brutal killing of our innocent brothers in Pahalgam.
The Modi government is resolved to give a befitting response to any attack on India and its people. Bharat remains firmly committed to eradicating…
— Amit Shah (@AmitShah) May 7, 2025