जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या नंतर भारताने जशाच तसे उत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी मुख्यालये उद्ध्वस्त केली.
MP Sanjay Raut criticizes All-party delegation Operation Sindoor and Pahalgam attack
भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बारीक लक्ष होते. ते वॉर रूममधून या सर्व ऑपरेशनवर नजर ठेवून होते.
ही कारवाई अत्यंत अचूक आणि प्रभावी ठरली, ज्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांनाही त्वरित याची दखल घ्यावी लागली. ही कारवाई अत्यंत अचूक आणि प्रभावी ठरली, ज्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांनाही त्वरित याची दखल घ्यावी लागली.
या कारवाईनंतर पाकिस्ताननेही अधिकृतपणे याची कबुली दिली आहे. भारतीय सैन्याने मुरीदके येथे लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय आणि बहावलपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय पूर्णपणे उद्धवस्त केल्याची माहिती दिली आहे.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा महिलांना सोडून त्यांच्या पतींना मारलं होतं. महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं. त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या पतींवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी या मिशनचं नाव ‘मिशन सिंदूर’ ठेवण्यात आले.
भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' द्वारे पाकिस्तानातील ४ आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ५ दहशतवादी तळ उद्धवस्त केले. १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार मारण्यात आले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतीय सैन्याने मुजफ्फराबाद, बहावलपूर, कोटली, चाक अमरू, गुलपूर, भिंबर, मुरीदके आणि सियालकोट या ठिकाणी एकापाठोपाठ नऊ ठिकाणी हल्ले केले. काल रात्री साधारण १ च्या आसपास ही कारवाई करण्यात आली.
भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर 'ऑपरेशन सिंदूर' राबवून जश्याच तसे प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी मुख्यालये उद्ध्वस्त केली.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांनी आपला जीव गमावला. दहशतवादी हे भरती सैन्याच्या वेशात आले होते. त्यांनी आधी पर्यटकांची जात विचारली आणि नंतर त्यांच्यावर अंदाधुंध गोळीबार केला. त्याचाच बदल भारतीय सैन्याने घेतला आहे.