Mohan Yadav will be the next Chief Minister of Madhya Pradesh, approval given in the legislative party meeting
Mohan Yadav will be the next Chief Minister of Madhya Pradesh, approval given in the legislative party meeting

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री : मध्य प्रदेशातील निवडणूक निकालानंतर आठ दिवसांनी भाजपने मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली आहे. मोहन यादव हे मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. आता माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा केंद्रातील वाटचाल निश्चित झाल्याचे समजत आहे.

    Madhya Pradesh CM : मध्य प्रदेशात मुख्यमंत्र्याच्या नावाची प्रतीक्षा संपली आहे. भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मोहन यादव यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. 3 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशात निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि आठ दिवसांनंतर पक्षाच्या हायकमांडने त्यांचे नाव निश्चित केले. मोहन यादव तिसऱ्यांदा उज्जैन दक्षिणमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. यादव जुलै 2020 ते 2023 पर्यंत शिक्षण मंत्री होते आणि 2013 पासून सतत आमदार आहेत. याशिवाय नरेंद्र सिंह तोमर यांना विधानसभेचे अध्यक्ष केले जाऊ शकते.