प्रतिका रावल संघाबाहेर (फोटो- ians)
दुखापतीमुळे प्रतिका रावल भारतीय संघायबाहेर गेली आहे. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. प्रतिका रावल बाहेर पडल्याने सलामी फलंदाज म्हणून भारताने एक चांगला पर्याय गमावला आहे. तिच्या कारकिर्दीतील दुसरी कसोटी सामना खेळण्यासाठी ती उत्सुक होती. मात्र दुखापतीमुळे तिला बाहेर पडावे लागले आहे.
The stage is iconic. The challenge is immense. 👊 The Women in Blue are set for a red-ball showdown against England Women at Lord's. Watch #ENGWvINDW Test from 10th July, 3:30 PM onwards , LIVE on Sony Sports Network TV channels and Sony LIV. #SonySportsNetwork #SonyLIV pic.twitter.com/8Wbi2Okg63 — Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 8, 2026
प्रतिका रावल दुखापतीमुळे संघाबाहेर गेली आहे. बीसीसीआयने तिच्या जागी अनुभवी फलंदाज प्रिया पुनियाचा समावेश केला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी प्रतिका रावल कसोटी सामना खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तिच्या जागेवर प्रिया पुनियाचा समावेश करण्यात आला आहे. भारत अन् इंग्लंडमधील हा सामना 10 ते 13 जुलै दरम्यान खेळवला जाणार आहे.
थेट तंबूत! Jos Butler कडून एकाच सामन्यात 5 डिसमिसलचा रेकॉर्ड; भारताच्या फलंदाजांची लावली वाट
प्रतिका रावलने याच वर्षी म्हणेच मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध ती आपला दुसरी कसोटी सामना खेळणार होती. मात्र दुखापतीमुळे आता ती हा सामना खेळू शकणार नाहीये. मात्र दुखापतीने घातलेल्या खोड्यामुळे तिची लॉर्ड्सवर खेळण्याची सुवर्णसंधी हुकली आहे. भारत अ संघाकडून प्रतिका रावलने शानदार फलंदाजी केली होती. तसेच इंग्लंड अ विरुद्ध तिने भारत अ संघाचे दोन सामन्यांमध्ये नेतृत्व देखील केले होते. नुकत्याच पार पडलेल्या महिला टी-२० वर्ल्ड कपमध्ये प्रतिका रावलला भारतीय संघात स्थान दिले गेले नव्हते. तिने अद्याप भारतासाठी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाहीये.
‘…तर त्याला खेळवू नका’; Sanju Samson ला वगळताच अभिषेक नायरचे मोठे विधान
Jos Butler कडून एकाच सामन्यात 5 डिसमिसलचा रेकॉर्ड
विकेटकिपर जोस बटलरने एकाच सामन्यात विकेटकिपर म्हणून सर्वाधिक विकेट एकाच सामन्यात घेण्याचा विक्रम केला आहे. जोस बटलरने मेट प्रायरचा रेकॉर्ड मोडला आहे. 2007 मध्ये केपटाउनमध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात प्रायरने एकाच वेळेस 4 जणांना स्टंपमागे आउट केले होते. आता या यादीत जोस बटलर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या स्थानावर न्यूझीलंडचा मिचेल आहे. त्याने एकाच सामन्यात 6 डिसमिसल केले होते.






