सौजन्य : iStock
नवी दिल्ली : तिरुपती मंदिरातील लाडू-प्रसादावरून वाद निर्माण झाला होता. तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीसह इतर गोष्टींची भेसळ होत असल्याने खळबळ उडाली होती. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने स्वतः तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये भेसळ असल्याची पुष्टी करणारा प्रयोगशाळेचा अहवाल सार्वजनिक केला होता. मात्र, आता तिरुपती मंदिरात ‘नंदिनी’ तुपापासून लाडू बनवले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : धक्कादायक! तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादामध्ये फीश ऑईल असल्याचे सिद्ध, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी केले होते आरोप
भगवान विष्णूला समर्पित असे तिरुपती मंदिर आहे. हे मंदिर त्याच्या स्थापत्य आणि कारागिरीमुळे भक्तांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीसह इतर गोष्टींची भेसळ होत असल्याने खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेश सरकारने स्वतः तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये भेसळ असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर आता यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी झालेल्या प्रचंड वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लाडूंसाठी तूप पुरवणाऱ्या कंपनीत बदल केला. आता तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) लाडूंसाठी ‘नंदिनी’ ब्रँडचे तूप वापरणार आहे.
अमूल किंवा मदर डेअरी हे उत्तर भारतातील प्रसिद्ध डेअरी ब्रँड आहेत. ‘नंदिनी’ला दक्षिणेतही हाच दर्जा आहे. हा कर्नाटकातील सर्वात मोठा डेअरी ब्रँड आहे. मात्र, हा ब्रँड केवळ याच राज्यापुरता मर्यादित नाहीतर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि महाराष्ट्रातही आहे. नंदिनी ब्रँड कर्नाटक को-ऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स फेडरेशन लिमिटेड (KMF) द्वारे व्यवस्थापित केले जाते.
प्रसादात फिश ऑईल असल्याचे झाले होते सिद्ध
भारतातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले तिरुपती मंदिराच्या प्रसादामध्ये फिश ऑईल असल्याचे सिद्ध झाले आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती मंदिरातील प्रसादामध्ये तूपाऐवजी प्राण्यांचा चरबीचा वापर केला जात असल्याचा आरोप लावला होता. त्यानंतर प्रसादाचा नमुना हा तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. रिपोर्टनंतर प्रसादात फिश ऑईल वापरले जात असल्याचे समोर आले.
हेदेखील वाचा : भारतातील ‘या’ भागात फक्त 2 जण दहावी पास, कोणालाही सरकारी नोकरी नाही, तर 78 वर्षांपासून करतायत मजूराचं काम






