रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 29 ऑगस्ट रोजी देशात इथेनॉल-चालित टोयोटा इनोव्हा कार लॉन्च (Nitin Gadkari launches world’s first ethanol Car) केली. या कार्यक्रमाला पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी देखील उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जेच्या वापराला चालना देण्यासाठी ही इथेनॉल-चालित कार लॉन्च करण्यात आली. इथेनॉल इंधनावर चालणारी जगातील पहिली कार आहे.
[read_also content=”चांद्रयान-३ चे लँडर मॉड्यूल तयार केल्याचा दावा करणाऱ्या इस्रोच्या बनावट वैज्ञानिकाला अटक! https://www.navarashtra.com/india/fake-scientist-of-isro-who-claimed-to-have-created-the-lander-module-of-chandrayaan-3-arrested-451282.html”]
इथेनॉल इंधनावर चालणारी ही जगातील पहिली कार आहे. त्याचबरोबर यांच आणखी एक वैशिष्ट म्हणजे या गाडीत इथेनॉल इंजिनसोबत इलेक्ट्रिक मोटारही आहे. किर्लोस्कर मोटर्सने ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशनसोबत ही कार बनवली आहे. ही कार शहरात २८ किमी तर महामार्गावर ३५ किमी/ली. मायलेज देईल.
यावेळी मंत्री गडकरी म्हणाले की, इथेनॉलवर चालणारी कार पेट्रोलवर चालणाऱ्या कारच्या तुलनेत पर्यावरणासाठी सुरक्षित आहे. इथेनॉलवरील कार ७७% कमी कार्बन उत्सर्जन करतात. तसेच इंधन ५४-५६ रु./ लि. मिळत आहे, जे पेट्रोलच्या तुलनेत सुमारे ५०% स्वस्त आहे. ते म्हणाले, भारत तीन महिन्यात २०% इथेनॉल मिश्रणच्या क्षमता गाठू शकतो. देशातील सर्व कार, दुचाकी, ऑटो १००% इथेनॉलवर चालावतीत हे माझे स्वप्न आहे.
“मला विश्वास आहे की भारत लवकरच इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो-एलएनजी, बायो-सीएनजी आणि इतर पर्यायी इंधन वाहनांचे जगातील पहिले वाहन निर्मिती केंद्र बनेल. पर्यायी इंधनामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचा संपूर्ण परिदृश्य बदलेल आणि यामुळे शेतकरी अन्नदत्त ते उर्जादत्त बनतीलच पण जैव-विमान इंधनाचे पुरवठादारही बनतील,” असे गडकरी म्हणाले.