ट्विटरमध्ये (Twitter) नेहमी काही ना काही बदल पाहयला मिळतात. कधी ब्लू टिक (Blue Tick ) वरुन तर कधी ट्विटरच्या धोरणावरुन नवे बदल होत असतात. आत पुन्हा इलॅान मस्क यांनी नॉन-ट्विटर वापरकर्त्यांसाठी एक नवीन नियम जाहीर केला आहे. नवीन नियमानुसार, जर तुमचे ट्विटरवर खाते नसेल, तर तुम्हाला ट्विटर वापरता येणार नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुम्ही ट्विटर वापरकर्ते नसल्यास, तुम्ही ट्विट किंवा कोणाचेही प्रोफाइल पाहू शकणार नाही.
[read_also content=”श्रीमंतांचा थाटच वेगळा! राम चरणच्या लेकीचं बारसं, मुकेश अंबानींकडून एक कोटींचा सोन्याचा पाळणा गिफ्ट https://www.navarashtra.com/movies/mukesh-ambani-gifts-golden-cradle-to-ram-charan-daughter-on-naming-ceremony-nrps-425778.html”]
यापूर्वी, एखाद्या व्यक्तीचे Twitter खाते नसलं तरीही, तो एखाद्या व्यक्तिशी संवाद साधत नसेल किंवा ट्विट लाईक करत नसेल तरीही, तो किमान ट्वीट पाहू शकत होता. मात्र नवा नियम आल्यानंतर आता नॉन-ट्विटर यूजर्सना मिळणारी मोफत सुविधा बंद होणार आहे.
प्लॅटफॉर्मवरून थर्ड-पार्टी डेटा स्क्रॅपिंगच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे मस्क यांनी ट्विटरवर सांगितले आहे. तसेच मस्क म्हणाले की, अनेक कंपन्या ट्विटर डेटा स्क्रॅप करत आहेत. याचा नियमित वापरकर्त्यांच्या सेवेवर नकारात्मक परिणाम होत आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
मस्कने यापूर्वी ट्विटरचा डेटा अधिकृततेशिवाय वापरल्याबद्दल अनेक कंपन्यांवर टीका केली होती.त्याने मायक्रोसॉफ्टवर त्याच्या एआयला प्रशिक्षण देण्यासाठी ट्विटर डेटाचा बेकायदेशीरपणे वापर केल्याचा आरोप केला आणि ओपनएआय तेच करत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.हा अलीकडील बदल अधिक लोकांना Twitter खाती तयार करण्यास प्रोत्साहित करू शकतो, परंतु जर तो कायमस्वरूपी बदल झाला तर त्याचा परिणाम इंटरनेट संग्रहणावर होऊ शकतो, जो आपोआप ट्विट कॅप्चर करतो आणि जतन करतो.मात्र, या बदलामुळे सर्च इंजिनवरील ट्विट्सच्या रँकिंगवर परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
मस्कने अलीकडेच NBCUniversal मधील जाहिरात विभागाच्या माजी प्रमुख लिंडा याकारिनो यांना ट्विटरचे नवीन सीईओ म्हणून नियुक्त केले आहे, तर मस्क स्वतः कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम करत आहे.