AI क्षेत्रात मोठी हालचाल! Elon Musk आणि Satya Nadella यांनी केली भागीदारी, करार बदलणार का टेक विश्वाची दिशा?
सत्या नडेला यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे की, मायक्रोसॉफ्ट कॉपायलट स्टुडिओमधील लवचिकता अधिक वाढवण्यासाठी यामध्ये ग्रोक 4.1 फास्टचा सपोर्ट मिळणार आहे. हे टूल डेवलपर्सना एआय एजंट बनण्यासाठी मदत करणार आहे. यूएसच्या ऑर्गेनाइजेशन एडमिनिस्ट्रेशनला आता कॉपायलट स्टुडिओमध्ये ग्रोक 4.1 फास्टचा सपोर्ट मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Today, GPT-5 launches across our platforms, including Microsoft 365 Copilot, Copilot, GitHub Copilot, and Azure AI Foundry. It’s the most capable model yet from our partners at OpenAI, bringing powerful new advances in reasoning, coding, and chat, all trained on Azure. It’s… pic.twitter.com/jHDA94YOL0 — Satya Nadella (@satyanadella) August 7, 2025
And Grok 4.20 coming soon https://t.co/53N8OxRenX — Elon Musk (@elonmusk) February 20, 2026
सत्याने नडेला यांनी शेअर केलेल्या पोस्टवर एलन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मस्कने यामध्ये अॅड-ऑन करत कंफर्म केले आहे की, लवकरच ग्रोक 4.20 येत आहे. म्हणजेच कॉपायलट स्टुडिओमध्ये लवकरच ग्रोक 4.2 चा सपोर्ट मिळणार आहे. माइक्रोसॉफ्टने शेअर केलेल्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की, एक्सएआयने मायक्रोसॉफ्ट कॉपायलट स्टुडिओच्या ग्रोइंग मॉडेल प्रोवाइडर लाइन-अपसाठी हातमिळवणी केली आहे. याला ऑर्गेनाइजेशन एडमिनिस्ट्रेशनद्वारे सक्षम केल्यानंतर ग्रोक 4.1 फास्टद्वारे फ्लेक्सिबल एजेंट्स डेव्हलप केले जाऊ शकतात. कॉपायलट स्टुडिओ एजेंट मेकर्सना मॉडेल अधिक चांगल्या पद्धतीने वापरण्यासाठी आणि इवॅल्यूट करण्यासाठी परवानगी देणार आहे. याच्या मदतीने मॉडेलचे कॉम्पलेक्स म्हणजे गुंतागुंतीचे वर्कफ्लो एनालाइज केले जाणार आहेत.
AI कंटेंटवर आता लेबल अनिवार्य! बनावट फोटो-व्हिडीओ ३ तासांत हटवण्याचा नवा नियम लागू, वाचा सविस्तर
गेल्यावर्षी एक्सचा मालक असलेल्या एलन मस्कने मायक्रोसॉफ्टचे सिईओ सत्या नडेला यांना ओपनएआयच्या चॅटजीपीटीबाबत इशारा दिला होता. मस्कने म्हटलं होतं की, सॅम ऑल्टमॅन यांची कंपनी माइक्रोसॉफ्टला संपवू शकते. मात्र यावर प्रतिक्रिया देत सत्या नडेला म्हणाले होते की, GPT-5 मायक्रोसॉफ्ट प्लॅटफॉर्मवर लाँच करण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्ट 365 कोपायलट, कोपायलट, गिटहब कोपायलट आणि अझूर एआय फाउंड्रीमध्ये GPT-5 चा सपोर्ट मिळणार आहे. मायक्रोसॉफ्टने ओपनएआयला चॅटजीपीटी विकसित करण्यास मदत केली.






