Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parliament Winter Session: उच्च न्यायालयात ‘RSSचे न्यायाधीश’; DMK खासदाराच्या टिकेवरून लोकसभेत राडा

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवार हा पाचवा दिवस आहे. गुरुवारी विरोधी पक्षाच्या खासदारांनी दिल्लीच्या वायू प्रदूषणावरून संसदेबाहेर निदर्शने केली. अनेक खासदार गॅस मास्क घालून आले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 05, 2025 | 04:30 PM
Parliament Winter Session;

Parliament Winter Session;

Follow Us
Close
Follow Us:
  • संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस
  • बालू यांच्यांकडून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा “RSS न्यायाधीश” उल्लेख
  • देशभरात इंडिगोच्या विमान सेवा थांबल्याच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक
Parliament Winter Session: लोकसभेत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. आजही संसदेत सत्ताधारी महाआघाडी आणि विरोधी इंडिया आघाडीत जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. तामिळनाडूचे अण्णा द्रमुक पक्षाचे खासदार टी. आर. बालू आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यात जोरदार वाद झाला. एका मुद्द्यावर बोलताना खासदार टी.आर. बालू यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा उल्लेख “RSS न्यायाधीश” असा केला. बालू यांच्या याच विधानावरून किरेन रिजिजू यांनी लगेचच आक्षेप घेतला. इथेच वादाची ठिणगी पडली. (Parliament Winter Session)

किरेन रिजिजू म्हणाले, “तुम्ही न्यायाधीशांना आरएसएस न्यायाधीश कसे म्हणू शकता? हे संसदेच्या शिष्टाचाराचे उल्लंघन करते. तुम्ही न्यायाधीशांविरुद्ध असंसदीय भाषा वापरू शकत नाही. तुम्ही माफी मागावी. न्यायव्यवस्थेला कलंकित करण्याची तुमची हिंमत कशी झाली.” असा सवाल रिजिजू यांनी उपस्थित केला.

Vladimir Putin at Rajghat : पुतिन राजघाटावर दाखल! वाहिली महात्मा गांधींना श्रद्धांजली; Visitor Book मध्ये लिहिला खास संदेश

दरम्यान, राज्यसभेत, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे देशभरात इंडिगोच्या विमान सेवा थांबल्याच्या मुद्द्यावर विरोधकांनी केंद्र सरकारकडे उत्तर मागितले. यावर ‘नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि केंद्र सरकार कोणती मदत देऊ शकते याचे मूल्यांकन करत असल्याचे सांगितले.

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka gandhi)  यांनी संसदेबाहेर इंडिगो विमानसेवेतील ढिसाळपणावर निशाणा साधला. ” इंडिगोच्या समस्या सरकारच्या मक्तेदारी मॉडेलमुळे निर्माण झाल्या आहेत. सरकारने देशातील बहुतेक संसाधने काही व्यक्तींच्या हातात सोपवली आहेत. हे योग्य नाही. हे अर्थव्यवस्था, लोकशाही आणि देशासाठी चांगले नाही. यापूर्वी, राहुल गांधी यांनी X रोजी म्हटले होते की, “इंडिगोचे अपयश ही या सरकारच्या मक्तेदारी मॉडेलची किंमत आहे.” अशी टिका प्रियांका गांधी यांनी केली.

हिवाळी अधिवेशनात १० नवीन विधेयके सादर  होणार

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवार हा पाचवा दिवस आहे. गुरुवारी विरोधी पक्षाच्या खासदारांनी दिल्लीच्या वायू प्रदूषणावरून संसदेबाहेर निदर्शने केली. अनेक खासदार गॅस मास्क घालून आले होते. विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली आहे.

महत्त्वाच्या विधेयकांमध्ये काय बदल मांडले जाणार?

अणुऊर्जा क्षेत्रात मोठी सुधारणा:
लोकसभेच्या बुलेटिननुसार, अणुऊर्जा विधेयक देशातील अणुऊर्जेच्या वापरासाठी, नियंत्रणासाठी आणि नियमनासाठी नवीन चौकट देईल. यानुसार खाजगी कंपन्यांना अणुऊर्जा क्षेत्रात प्रवेशाची परवानगी मिळेल. त्यामुळे खाजगी कंपन्या अणुऊर्जा प्रकल्प उभारू शकतील, ही ऐतिहासिक बदलाची नोंद ठरणार आहे.

DGCA चा FDTL नवीन नियम सर्वांना लागू, मग Indigo वर सर्वाधिक परिणाम का? जाणून घ्या कारण

उच्च शिक्षण आयोगाची स्थापना:
सरकार उच्च शिक्षण क्षेत्रातील सुधारणा वेगाने करण्यासाठी नवीन आयोग स्थापन करणार आहे. या विधेयकाद्वारे महाविद्यालये आणि विद्यापीठांना अधिक स्वायत्तता आणि पारदर्शक व्यवस्था मिळणार. सध्या अस्तित्वात असलेल्या यूजीसी, एआयसीटीई आणि एनसीटीई या संस्थांचा समावेश एका आयोगात केला जाईल.

महामार्ग प्रकल्पांसाठी जलद भूसंपादन:
राष्ट्रीय महामार्ग (सुधारणा) विधेयकाद्वारे भूसंपादन प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शक केली जाणार आहे. यामुळे महामार्ग प्रकल्पांतील विलंब कमी होण्यास मदत होईल.

कंपनी आणि एलएलपी कायद्यात सुधारणा:
सरकार २०२५ मध्ये कॉर्पोरेट कायदा (सुधारणा) विधेयक सादर करणार असून, कंपनी कायदा २०१३ आणि एलएलपी कायदा २००८ मध्ये बदल करून व्यवसाय सुलभता वाढवण्याचा उद्देश आहे.

सर्व बाजार कायद्यांचे एकत्रीकरण:
सिक्युरिटीज मार्केट्स कोड बिल, २०२५ द्वारे सेबी कायदा, डिपॉझिटरीज कायदा आणि सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स कायदा एकत्र करून एकच सर्वसमावेशक कायदा तयार करण्यात येणार आहे.

संविधानिक सुधारणा प्रस्ताव:
१३१ व्या संविधान सुधारणा विधेयकाद्वारे चंदीगड केंद्रशासित प्रदेशाला संविधानाच्या कलम २४० च्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव आहे. या कलमानुसार केंद्र सरकारला काही केंद्रशासित प्रदेशांसाठी नियम बनवण्याचा अधिकार मिळतो.

 

Web Title: Parliament winter session rss judge in high court ruckus in lok sabha over dmk mps criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 04:30 PM

Topics:  

  • aidmk
  • national news
  • parliament winter session 2025

संबंधित बातम्या

Indigo च्या 550 पेक्षा अधिक फ्लाईट्स रद्द, देशभरातील एअरपोर्ट्सवर गोंधळ; 12 तास अन्नपाण्याशिवाय अडकले प्रवासी
1

Indigo च्या 550 पेक्षा अधिक फ्लाईट्स रद्द, देशभरातील एअरपोर्ट्सवर गोंधळ; 12 तास अन्नपाण्याशिवाय अडकले प्रवासी

Tobacco Tax Explained: भारत सरकारचा मोठा निर्णय! तंबाखू करातून मिळणार राज्यांना मोठा वाटा..; सीतारमणांचा मोठा खुलासा
2

Tobacco Tax Explained: भारत सरकारचा मोठा निर्णय! तंबाखू करातून मिळणार राज्यांना मोठा वाटा..; सीतारमणांचा मोठा खुलासा

Explainer: डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीचा भारतातील सामान्य लोकांवर कसा परिणाम होईल?
3

Explainer: डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीचा भारतातील सामान्य लोकांवर कसा परिणाम होईल?

Sahara Refund Update: सहारा गुंतवणूकदारांसाठी मोठा दिलासा! 3.54 दशलक्ष गुंतवणूकदारांना 6,842 कोटी परत? अमित शहांची माहिती
4

Sahara Refund Update: सहारा गुंतवणूकदारांसाठी मोठा दिलासा! 3.54 दशलक्ष गुंतवणूकदारांना 6,842 कोटी परत? अमित शहांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.