पाटणा : पाटणा विद्यापीठाचे (Patna University) लॉ कॉलेज कॅम्पस बॉम्ब आणि गोळ्यांच्या आवाजाने सोमवारी पुन्हा हादरले. ही घटना सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. इक्बाल वसतिगृहातील व मौलाना अबुल हसन अली नदवी अल्पसंख्याक वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये ही हाणामारी झाली.
मिंटो हॉस्टेल आणि जॅक्सन हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांमध्ये नदवी आणि इक्बाल हॉस्टेलमध्ये बॉम्बस्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच गोळ्यांच्या अनेक फैरीही झाडण्यात आल्याची माहिती आहे. पाटणा शहरातील पीरबाहोर पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पीरबहोर पोलिस ठाण्याचे पोलिस, टाऊन डीएसपी यांच्यासह तीन पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत विद्यार्थी तेथून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनुसार, दोन दिवसांपूर्वी मिंटो आणि इकवाल वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. यावेळी त्यांनी एकमेकांना पाहुन घेण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून जिवंत देशी बॉम्ब जप्त केला आहे.