Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Narendra Modi: उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण

PM Narendra Modi,: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, ८ सप्टेंबर रोजी गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून वडोदरा येथे ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 08, 2026 | 12:17 PM
उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण

उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण

Follow Us
Follow Us:
  • दादरी ते नवी मुंबई मालवाहतुकीला ‘सुपरफास्ट’ गती
  • वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर पूर्णपणे कार्यान्वित
  • देशाच्या लॉजिस्टिक्सला नवी रफ्तार!
  • मोदींच्या हस्ते WDFCचे ३ महत्त्वाचे टप्पे राष्ट्राला समर्पित होणार
 

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (8 सप्टेंबर 2026 ) गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. वडोदरा येथे दुपारी सुमारे १२ वाजता ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण केले जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता मुंबईत पंतप्रधानांच्या हस्ते ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’चे उद्घाटन होणार आहे.(PM Narendra Modi)

वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरचा महत्त्वाचा टप्पा

या दौऱ्यात पंतप्रधान वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या (Western Dedicated Freight Corridor) तीन महत्त्वाच्या विभागांचे राष्ट्रार्पण करणार आहेत. एकूण ३२६ रूट किलोमीटर लांबीच्या या तीन विभागांसाठी २०,७०० कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. यामध्ये साणंद (उत्तर)-मकरपुरा, न्यू उंबरगाव-न्यू सफाळे आणि न्यू सफाळे-JNPT या विभागांचा समावेश आहे. हे विभाग सुरू झाल्यानंतर डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर नेटवर्क संपूर्ण लांबीवर कार्यान्वित होईल.

India Australia Uranium Deal: चीनची होणार जळफळाट,ऑस्ट्रेलिया देणार भारताला युरेनियम; दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचा करार

JNPAशी थेट कनेक्टिव्हिटी

या प्रकल्पामुळे जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी अर्थात JNPAशी थेट मालवाहतूक कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. त्यामुळे आयात-निर्यात अर्थात EXIM कार्गोची वाहतूक अधिक वेगाने करता येईल. औद्योगिक केंद्रे आणि बंदरांमधील जोडणी मजबूत होण्याबरोबरच मालवाहतुकीचा वेळ आणि लॉजिस्टिक्स खर्च कमी करण्यास मदत होईल. मुंबईच्या विद्यमान रेल्वे नेटवर्कवरील मालवाहतुकीचा ताण कमी होणे हाही या प्रकल्पाचा महत्त्वाचा फायदा आहे.

चार ठिकाणांहून मालगाड्यांना हिरवा झेंडा

पंतप्रधान न्यू साणंद (उत्तर), न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव आणि न्यू JNPT येथून मालगाडी सेवांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्याचबरोबर वडोदरा ते टांडा रोड या नव्या रेल्वे सेवेलाही प्रारंभ केला जाणार आहे. याचा वडोदरा, छोटा उदयपूर आणि अलीराजपूर जिल्ह्यांना फायदा अपेक्षित आहे.

९,७०० कोटींचे आणखी तीन रेल्वे प्रकल्प

पंतप्रधान ३२९ किलोमीटर लांबीच्या आणि ९,७०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या तीन रेल्वे प्रकल्पांची पायाभरणीही करणार आहेत. यामध्ये वडोदरा-रतलाम तिसरी आणि चौथी रेल्वे लाइन, मियागाम करजन-चोरंडा-मलसार गेज रूपांतरण आणि विश्वामित्री-दभोई दुहेरीकरण प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे गुजरात आणि मध्य प्रदेशदरम्यान प्रवासी तसेच मालवाहतूक क्षमता वाढण्याची अपेक्षा आहे.

महामार्ग प्रकल्पांनाही चालना

सुमारे १,७८० कोटी रुपयांच्या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. NH-48 वरील कामरेज-चलथान विभागाचे सहापदरीकरण, वडोदरा-सूरत मार्गावर तापी आणि नर्मदा नद्यांवरील प्रमुख पुलांसह अतिरिक्त पायाभूत सुविधा आणि NH-53 वरील अभवा, मिंधोला व खजोद जंक्शनवरील ग्रेड-सेपरेटेड स्ट्रक्चर्सचा यात समावेश आहे. कंदारी चौकडी आणि लुवारा पाटिया येथील सहापदरी उड्डाणपुलांचे उद्घाटनही होणार आहे.

मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६

मुंबईत ८ ते ११ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या Global Fintech Fest 2026च्या सातव्या आवृत्तीचे उद्घाटनही आज पंतप्रधान करणार आहेत. यंदाची थीम “Potential to Impact: Agentic AI, Tokenisation, Quantum – Trusted, Connected, Global Systems for Inclusive Finance” अशी आहे. या परिषदेत धोरणकर्ते, नियामक, केंद्रीय बँका, वित्तीय संस्था, फिनटेक आणि तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार तसेच शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

१०० वर्षांचा प्रवास! Bajaj समूहाने साजरे केले शताब्दी वर्ष, असा आहे आतापर्यंतचा प्रवास

Web Title: Pm modi to inaugurate western dedicated freight corridor sections dadri to jnpa connectivity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • Gujarat
  • maharashtra
  • narendra modi

संबंधित बातम्या

Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याने बदलणार नाशिकचा वाहतूक नकाशा; ६५.६ किमी रिंग रोडसह १,४३५ किमी रस्त्यांचा महाप्रकल्प
1

Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याने बदलणार नाशिकचा वाहतूक नकाशा; ६५.६ किमी रिंग रोडसह १,४३५ किमी रस्त्यांचा महाप्रकल्प

Gondiya News: रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; बिबट्याचे मुंडके-धड झाले वेगळे! महालगाव शिवारातील घटना
2

Gondiya News: रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; बिबट्याचे मुंडके-धड झाले वेगळे! महालगाव शिवारातील घटना

Nitesh Rane: दीड-दोन तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत! सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक फेरीबोट सेवा
3

Nitesh Rane: दीड-दोन तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत! सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक फेरीबोट सेवा

Smart Meter Protest: ‘स्मार्ट मीटर हटवा, अन्यथा उखडून फेकू’; शेकापचे जयंत पाटील यांचा सरकारला इशारा
4

Smart Meter Protest: ‘स्मार्ट मीटर हटवा, अन्यथा उखडून फेकू’; शेकापचे जयंत पाटील यांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.