Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… मोठे दुष्परिणाम होण्याची भीती”; Iran Israel युद्धावर पंतप्रधान मोदींचे मोठे भाष्य

आज राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत देशातील नागरिकांना माहिती दिली. अनेक भारतीय जहाजे युद्धामुळे अडकली असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी संसदेत नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 24, 2026 | 02:20 PM
“… मोठे दुष्परिणाम होण्याची भीती”; Iran Israel युद्धावर पंतप्रधान मोदींचे मोठे भाष्य
Follow Us
Close
Follow Us:

इराण-इस्त्रायल युद्धावर मोदींचे भाष्य 
राज्यसभेत पंतप्रधान मोदी यांनी दिली माहिती 
युद्धामुळे अनेक भारतीय जहाजे अडकली – मोदी 

Iran -Israel War: सध्या इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारताला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तेलसाठा, गॅसचा पुरवठा यावर परिणाम झाला आहे. दरम्यान आज राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत देशातील नागरिकांना माहिती दिली. अनेक भारतीय जहाजे युद्धामुळे अडकली असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी संसदेत नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आम्ही गल्फमधील देशांच्या संपर्कात आहोत. आम्ही इराण, इस्त्रायलो आणि अमेरिकेशी संपर्कात आहे. संवाद होऊन यावर तोडगा निघावा हाच यांचा प्रयत्न आहे. आतापर्यंत 3 लाख 75 हजार भारतीय आखाती देशांमधून भारतात परतले आहेत. जगभरात गंभीर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे.”

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे. संकटकाळात सरकार संवेदनशील आहे. होमुर्झ सामुद्रधुनीमधून मोठ्या प्रमाणात गॅस, तेलाचा पुरवठा होतो. सर्व देशांशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. हल्ल्यांमध्ये काही भारतीयांचा मृत्यू झाला आहे तर काही जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार केले जात आहे.”

India First : सरकार संवेदनशील, सतर्क आणि मदतीसाठी सज्ज, 3.75 लाख भारतीय परतले; PM Modiनी लोकसभेत मांडली रणनीती

“जिथून तेल आणि गॅस भारतात आणता येईल त्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. हे आमचे प्रयत्न शेवटपर्यंत सुरू राहतील. युद्ध दीर्घकाळ चालल्यास मोठे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. इराणमधून 1 हजारपेक्षा जास्त भारतीय मायदेशी परतले आहेत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

PM Modi नी लोकसभेत मांडली रणनीती

जगाच्या पाठीवर कुठेही संकट आले की, भारताचे ‘संकटमोचक’ धोरण पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मध्य-पूर्वेत इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या २४ दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जग एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे. अशा परिस्थितीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत देशाला संबोधित करताना भारतीयांच्या सुरक्षिततेबाबत सर्वात मोठा अपडेट दिला आहे. “युद्धग्रस्त भागातून आतापर्यंत ३ लाख ७५ हजार भारतीयांना आम्ही सुखरूप बाहेर काढले आहे,” असे सांगत पंतप्रधानांनी भारताच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली.

PM Modi in Rajya sabha : जागतिक युद्धाची झळ भारतापर्यंत..राज्यसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी मांडणार सत्यस्थिती

पंतप्रधान मोदींनी नमूद केले की, केवळ जमिनीवरच नाही तर समुद्रातही अनेक भारतीय कर्मचारी जहाजांवर अडकले आहेत. “आखाती देशांमध्ये जवळपास १ कोटी भारतीय काम करतात. त्यांच्या कुटुंबांची चिंता ही माझी वैयक्तिक चिंता आहे,” अशा शब्दांत मोदींनी आपले भावनिक नाते स्पष्ट केले.

Web Title: Pm narendra modi live rajysabha in iran israel war crude oil lpg gas issue in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • crude oil
  • Iran Israel Conflict
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Sanjay Nirupam: “पंतप्रधानांनी काय आता पायी चालावे का?”; इंधन बचतीच्या आवाहनावरून विरोधकांना संजय निरुपम यांचे सडेतोड उत्तर
1

Sanjay Nirupam: “पंतप्रधानांनी काय आता पायी चालावे का?”; इंधन बचतीच्या आवाहनावरून विरोधकांना संजय निरुपम यांचे सडेतोड उत्तर

Shambhuraj Desai: देशहित प्रथम! पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला शंभूराज देसाईंचा प्रतिसाद; कुटुंबासह नियोजित ‘युरोप दौरा’ केला रद्द!
2

Shambhuraj Desai: देशहित प्रथम! पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला शंभूराज देसाईंचा प्रतिसाद; कुटुंबासह नियोजित ‘युरोप दौरा’ केला रद्द!

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर Gold बाबत मोठे अपडेट! देशात लवकरच सुरू होणार ‘बुलियन बँक’;काय होणार फायदा?
3

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर Gold बाबत मोठे अपडेट! देशात लवकरच सुरू होणार ‘बुलियन बँक’;काय होणार फायदा?

Sharad Pawar News: देशाच्या अर्थव्यवस्थेवर..; पंतप्रधान मोदींच्या त्या आवाहनानंतर शरद पवारांचे सूचक विधान
4

Sharad Pawar News: देशाच्या अर्थव्यवस्थेवर..; पंतप्रधान मोदींच्या त्या आवाहनानंतर शरद पवारांचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.