पंतप्रधान मोदींनी डीपफेक व्हिडिओ बद्दल व्यक्त केली चिंता, सुरक्षेसाठी केलं ‘हे’ खास आवाहन!

नवी दिल्ली येथील पक्षाच्या मुख्यालयात भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) दिवाळी मिलन कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भारताला विकसित भारत बनवण्याच्या आपल्या संकल्पाचाही उल्लेख केला

    नवी दिल्ली: गेल्या काही दिवसापासून कृत्रिम बुध्दिमत्तेच्या (Artificial Intelligence)च्या डिपफेक तंत्रज्ञानाच्या मदतीने (AI Deepfake technology) सेलेब्रिटिंच्या फोटो, व्हिडिओसोबत छेडछाड करुन इंटरनेटवर व्हायरल करण्याच्या घटना घडल्या आहेत. याबद्दल संपुर्ण जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या व्हिडिओ बद्दल चिंता व्यक्त केली असून (PM Narendra Modi On Deepfake Video)  यापासून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले.

    नवी दिल्ली येथील पक्षाच्या मुख्यालयात भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) दिवाळी मिलन कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भारताला विकसित भारत बनवण्याच्या आपल्या संकल्पाचाही उल्लेख केला. हे केवळ वक्तृत्व नसून जमीनी वास्तव असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.

    यावेळी,  ‘वोकल फॉर लोकल’ला लोकांचा पाठिंबा मिळाल्याचे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, कोविड-19 दरम्यान भारताने मिळवलेल्या कामगिरीमुळे लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे की देश आता थांबणार नाही. छठपूजा हा ‘राष्ट्रीय सण’ बनला असून ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचेही ते म्हणाले.