
दुसरीकडे, विरोधी पक्षांनी भाजपच्या विजयावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून सरकारवर मतचोरीचे गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या प्रचंड विजयानंतर, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली,या पोस्टमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. भाजपला थेट लक्ष्य करत त्यांनी या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, कधीकधी मतचोरी करून जागा चोरल्या जातात, तर कधीकधी संपूर्ण सरकारेच चोरली जातात. लोकसभेतील २४० भाजप खासदारांपैकी जवळपास प्रत्येक सहावा खासदार मतचोरीने जिंकला आहे.”
राहुल गांधी यांनी हरियाणा सरकारला घुसखोर संबोधत जोरदार निशाणा साधला आहे. “त्यांना ओळखणे अवघड नाही—भाजपच्याच भाषेत आपण त्यांना ‘घुसखोर’ म्हणायचे का? आणि हरियाणा? तिथले संपूर्ण सरकारच घुसखोर आहे.” जे संस्थांना आपल्या खिशात ठेवतात, जे मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियेत फेरफार करतात—ते स्वतःच “रिमोट-कंट्रोल” आहेत.” इतकेच नव्हे तर, सत्य ही भाजपची खरी भीती आहे. कारण जर निवडणुका निष्पक्ष असत्या, तर त्यांना आज १४० जागाही मिळाल्या नसत्या.” असा सणसणीत टोलाही राहुल गांधी यांनी लगावला आहे. या पोस्टमुळे नक्कीच राजकीय वर्तुळात चांगलाच गदारोळ माजणार असल्याचे दिसत आहे.
वोट चोरी से कभी सीटें चुराई जाती हैं, कभी पूरी सरकार। लोकसभा के 240 BJP सांसदों में से, मोटे तौर पर हर छठा सांसद वोट चोरी से जीता है। पहचानना मुश्किल नहीं – क्या उन्हें BJP की भाषा में “घुसपैठिए” कहें? और हरियाणा? वहाँ तो पूरी सरकार ही “घुसपैठिया” है। जो संस्थाएँ अपनी जेब में… — Rahul Gandhi (@RahulGandhi) May 6, 2026
१५,००० हून अधिक मतांनी पराभवभारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल निवडणुकीत २०७ जागा जिंकून इतिहास रचला. दरम्यान, तृणमूल काँग्रेसला केवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले आणि काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले. बंगालमधील भवानीपूर विधानसभा मतदारसंघात ममता बॅनर्जी भाजपचे सुवेंदू अधिकारी यांच्या विरोधात निवडणूक लढवत होत्या. सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा १५,००० हून अधिक मतांच्या फरकाने पराभव केला.
मात्र, ममता बॅनर्जी यांनी बंगालमधील हा निवडणुकीतील पराभव स्वीकारला नाही. त्या म्हणाल्या, “मी हरले नाही, माझी मते चोरली गेली आहेत.” याच संदर्भात, आज समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव हे देखील ममता बॅनर्जी यांना भेटण्यासाठी कोलकाताला जाणार आहेत.