NEET पेपरफुटीवरून राहुल गांधी आक्रमक
देशभरातील ३ मे रोजी वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेचा पेपर देशभरात घेण्यात येणार होता. मात्र परीक्षेपूर्वी पेपर फुटल्याने एनटीएने ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुल गांधी यांनी यावरून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत, “देशात पुन्हापुन्हा पेपर लीक का होत आहेत? या ‘परीक्षा पे चर्चा’ वर तुम्ही शांत का आहात? सारखे सारखे अपयशी ठरलेल्या शिक्षण मंत्र्यांना तुम्ही बरखास्त का करत नाहीत?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
राहुल गांधी आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून म्हणाले, “२०२४ मध्ये NEET पेपर लीक झाला. परीक्षा रद्द झाली नाही मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. सीबीआयने चौकशी सुरु केली. एक कमिटी बनवण्यात आली. २०२६ मध्ये पुन्हा NEET पेपर लीक झाला. परीक्षा रद्द झाली. मंत्र्यांनी पुन्हा राजीनामा दिला नाही. पुन्हा सीबीआय चौकशी करत आहे. आता पुन्हा एक कमिटी बनवण्यात येईल. मोदीजी, देश तुम्हाला काही प्रश्न विचारत आहे… उत्तर द्या… पुन्हा पुन्हा पेपर लीक का होत आहेत? पुन्हा पुन्हा या ‘परीक्षा पे चर्चा’ वर तुम्ही शांत का आहात? पुन्हा पुन्हा अपयशी ठरलेल्या शिक्षण मंत्र्यांना तुम्ही बरखास्त का करत नाहीत?” असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
NEET 2024:
पेपर लीक हुआ। परीक्षा रद्द नहीं हुई। मंत्री ने इस्तीफ़ा नहीं दिया। CBI ने जांच बिठाई। एक कमेटी बनी। NEET 2026:
पेपर लीक हुआ। परीक्षा रद्द हुई। मंत्री ने फिर इस्तीफ़ा नहीं दिया। CBI फिर जाँच कर रही है। एक और कमेटी बनेगी। मोदी जी, देश आपसे कुछ सवाल पूछ रहा है – जवाब… — Rahul Gandhi (@RahulGandhi) May 17, 2026
आपल्या दुसऱ्या ‘X’ पोस्टवरून ते म्हणाले, “आधी नीट पेपरफुटी, ज्याचा परिणाम २२ लाख विद्यार्थ्यांवर झाला. त्यानंतर सदोष ओएसएम प्रणालीमुळे सीबीएसईच्या इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांना अनपेक्षितपणे कमी गुण मिळाले – ज्यामुळे अनेकांनी आपली महाविद्यालयीन पात्रता गमावली. आता सीबीएसईच्या इयत्ता ९वीच्या लाखो विद्यार्थ्यांना १ जुलैपासून अचानक एक नवीन भाषा शिकायला सांगितले आहे, त्यासाठी शिक्षक नाहीत, पाठ्यपुस्तके नाहीत आणि एक “संक्रमणकालीन” उपाय म्हणून १४ वर्षांच्या मुलांना इयत्ता ६ वीची पुस्तके दिली जात आहेत.”
First the NEET paper leak affecting 22 lakh students. Then CBSE Class 12 students receiving unexpectedly low marks from a broken OSM system – many losing their college eligibility. Now lakhs of CBSE Class 9 students suddenly asked to learn a new language from July 1, with no… — Rahul Gandhi (@RahulGandhi) May 17, 2026
“तीन परीक्षा. तीन वयोगट. एक मंत्री. धर्मेंद्र प्रधानजी एकटेच अपयशी ठरलेले नाहीत. ते भारतातील विद्यार्थ्यांच्या प्रत्येक वयोगटात एकाच वेळी अपयशी ठरले आहेत. प्रत्येक घोषणा मुलांना अनिश्चिततेच्या गर्तेत अधिक खोलवर ढकलत आहे. प्रत्येक अपयशाला शिक्षा होत नाही. शिक्षण मंत्रालय हे आपत्तींचे खाते बनले आहे. पंतप्रधान मोदीजी – तुम्ही आणि तुमच्या मंत्र्यांनी ज्या लाखो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे, त्यांची तुम्ही किमान माफी तरी मागू शकता का?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.






