Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…

Rahul Gandhi : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून काँग्रेस आणि इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. जंतरमंतरकडे आंदोलनासाठी जात असताना राहुल गांधी, प्रियंका गांधींसह विरोधी खासदारांना दिल्ली पोलिसांनी रोखून ताब्यात घेतलं.

  • By विवेक
Updated On: Oct 07, 2026 | 07:35 PM
Rahul Gandhi Detained

Rahul Gandhi Detained

Follow Us
Follow Us:
  • जंतरमंतरकडे जाताना राहुल गांधींना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
  • प्रियंका गांधींसह इंडिया आघाडीच्या खासदारांनाही पोलिसांनी रोखलं
  • ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह SIR आणि मतदार यादीवर इंडिया आघाडीच्या मागण्या
 

Rahul Gandhi : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. इंडिया आघाडीच्या खासदारांसह जंतरमंतर मैदानावर आंदोलनासाठी जात असताना दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांना रोखून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. यावेळी प्रियंका गांधी यांच्यासह आंदोलनात सहभागी झालेल्या इतर खासदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीचे जवळपास २०० खासदार जंतरमंतरकडे निघाले होते. मात्र, जंतरमंतर मैदानापासून सुमारे १०० मीटर अंतरावरच पोलिसांनी तीन बस अडवल्या.

राहुल गांधींचा रस्त्यावरच ठिय्या

पोलिसांनी आंदोलनाला जाण्यापासून रोखल्यानंतर राहुल गांधी यांनी त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. प्रियंका गांधीही यावेळी रस्त्यावर बसल्या. आंदोलन करण्यापासून परावृत्त करण्यासाठी पोलिसांनी राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राहुल गांधी आंदोलनावर ठाम राहिले.

Jantar Mantar Protest: दिल्लीत जमावबंदी लागू, जंतर मंतरला छावणीचे स्वरूप सुरक्षा वाढवली, ज्ञानेश कुमारांविरोधात वातावरण पेटणार

त्यानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर प्रियंका गांधी आणि इतर खासदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, पोलिसांनी आपल्यासह इतर खासदारांना मारहाण केल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे.

आधीही राहुल गांधींना घेतलं होतं ताब्यात

याआधी मंगळवारी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी त्यांना अडवलं होतं. त्यानंतर राहुल गांधी यांनी आकाशवाणी भवनजवळ तब्बल आठ तास ठिय्या मांडला. रात्रीच्या सुमारास पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं.

यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या खासदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमानंतर खासदार तीन बसमधून जंतरमंतरकडे निघाले होते.

इंडिया आघाडीच्या नेमक्या मागण्या काय?

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसोबतच इंडिया आघाडीने SIR प्रक्रियेबाबतही काही मागण्या केल्या आहेत.

  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी संसदेत प्रस्ताव आणावा.
  • SIR प्रक्रियेत मतदार यादीतून वगळण्यात आलेली नावं सार्वजनिक करावीत.
  • मतदाराचं नाव वगळण्यापूर्वी संबंधित मतदाराला नोटीस आणि अपीलची संधी द्यावी.
  • ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात.

‘ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा’

राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे देशाची लोकशाही धोक्यात आल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरून काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि SIRच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

Harshvardhan Sapkal : ‘ज्ञानेश कुमार महाराष्ट्रात आले तर तोंडाला काळं फासू’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

Web Title: Rahul gandhi detained delhi police jantar mantar protest gyanesh kumar resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 07:35 PM

Topics:  

  • Congress
  • Delhi Police
  • election commission of india
  • Gyanesh Kumar
  • Jantar Mantar
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Harshvardhan Sapkal : ‘ज्ञानेश कुमार महाराष्ट्रात आले तर तोंडाला काळं फासू’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
1

Harshvardhan Sapkal : ‘ज्ञानेश कुमार महाराष्ट्रात आले तर तोंडाला काळं फासू’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले
2

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको, वांद्रे रिक्लेमेशन येथे मध्यरात्री आंदोलन
3

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको, वांद्रे रिक्लेमेशन येथे मध्यरात्री आंदोलन

INDIA Alliance Delhi Protest:दिल्लीत हालचालींना वेग; इंडिया’चे खासदार निवडणूक आयोगाच्या दिशेने रवाना
4

INDIA Alliance Delhi Protest:दिल्लीत हालचालींना वेग; इंडिया’चे खासदार निवडणूक आयोगाच्या दिशेने रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.