Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG टंचाईतून देशाला दिलासा! 94,000 मेट्रिक टन गॅस घेऊन दोन महाकाय जहाजे भारताकडे रवाना; 31 मार्चला मुंबईत होणार दाखल

पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, BW TYR आणि BW ELM ही दोन एलपीजी वाहक जहाजे संवेदनशील सागरी क्षेत्र ओलांडून आता भारतीय जलसीमेत प्रवेश करत आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 29, 2026 | 08:29 PM
LPG टंचाईतून देशाला दिलासा! 94,000 मेट्रिक टन गॅस घेऊन दोन महाकाय जहाजे भारताकडे रवाना (Photo Credit- AI)

LPG टंचाईतून देशाला दिलासा! 94,000 मेट्रिक टन गॅस घेऊन दोन महाकाय जहाजे भारताकडे रवाना (Photo Credit- AI)

Follow Us
Close
Follow Us:
  • LPG टंचाईतून देशाला दिलासा!
  • 94,000 मेट्रिक टन गॅस घेऊन दोन महाकाय जहाजे भारताकडे रवाना
  • 31 मार्चला मुंबईत होणार दाखल
LPG gas supply: देशात सध्या जाणवत असलेल्या एलपीजी (LPG) टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Central Goverment) मोठी आणि दिलासादायक बातमी दिली आहे. सुमारे 94,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन दोन महाकाय गॅस टँकर जहाजे सुरक्षितपणे भारतीय किनारपट्टीच्या दिशेने झेपावत आहेत. मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि सागरी मार्गावरील धोके लक्षात घेता, या जहाजांच्या सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली असून, यामुळे देशातील गॅस पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

मुंबई आणि न्यू मंगलोरला मिळणार इंधन पुरवठा

पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, BW TYR आणि BW ELM ही दोन एलपीजी वाहक जहाजे संवेदनशील सागरी क्षेत्र ओलांडून आता भारतीय जलसीमेत प्रवेश करत आहेत. यातील एक जहाज मुंबईच्या दिशेने येत असून, ते 31 मार्च पर्यंत बंदरात दाखल होईल. दुसरे जहाज न्यू मंगलोरच्या दिशेने मार्गस्थ असून, ते 1 एप्रिल पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या मोठ्या इंधन साठ्यामुळे घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या उपलब्धतेवर सकारात्मक परिणाम होणार आहे.

Two LPG carriers, BW Tyr and BW Elm, carrying a combined #LPG cargo of about 94,000 MT, have safely transited the region and are moving towards India shores. BW Tyr is proceeding towards Mumbai with an expected time of arrival on 31 March 2026 & BW Elm is en route to New… pic.twitter.com/S7ZmHQlg5g — Gulistan News (@GulistanNewsTV) March 29, 2026

PIA News: पाकिस्तानच्या आकाशात ‘आर्थिक’ संकट! विमान इंधन 150 टक्क्यांनी महागले; ‘PIA’ कायमची बंद होण्याच्या उंबरठ्यावर

युद्धाच्या सावटात भारतीय नाविक सुरक्षित

अमेरिका आणि इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यांनंतर पर्शियन गल्फ (खाडी क्षेत्र) भागात मोठा तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, भारतीय जहाजे आणि नाविक पूर्णपणे सुरक्षित आहेत. गेल्या 24 तासांत कोणत्याही भारतीय जहाजाबाबत अनुचित प्रकार घडलेला नाही. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केले आहे की, जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी आणि व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी या सागरी मार्गावर शांतता व स्थिरता राखणे अत्यंत आवश्यक आहे.

होर्मुजची सामुद्रधुनी आणि भारताची सुरक्षा यंत्रणा

होर्मुजची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) हा जागतिक तेल आणि गॅस वाहतुकीसाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग मानला जातो. सध्या या भागात भारतीय ध्वज असलेली 18 जहाजे असून त्यामध्ये सुमारे 485 भारतीय नाविक कार्यरत आहेत. ‘डायरेक्टोरेट जनरल ऑफ शिपिंग’ (DG Shipping) 24 तास या जहाजांवर लक्ष ठेवून आहे. भारतीय दूतावास आणि जहाज मालकांशी सतत संपर्क साधून खबरदारी घेतली जात आहे. सरकारने आतापर्यंत 900 हून अधिक भारतीय नाविकांची सुरक्षित सुटका केली असून ही प्रक्रिया आजही सुरू आहे.

ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचे ‘मिशन’

जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या या सागरी मार्गावरून होणारी वाहतूक बाधित होऊ नये, यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आगामी काळात एलपीजीचा हा मोठा साठा दाखल झाल्यावर बाजारातील तुटवडा कमी होईल आणि किमतींवर नियंत्रण मिळवणे सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

श्रीलंकेसाठी भारत बनला ‘संकटमोचक’! मध्यपूर्वेतील युद्धामुळे कोलमडलेल्या लंकेला 38,000 मेट्रिक टन इंधनाची ‘संजीवनी’

Web Title: Relief for the nation from the lpg shortage two giant ships carrying 94000 metric tons of gas depart for india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 08:29 PM

Topics:  

  • Central Governement
  • LPG Crisis
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

HPCL चा ग्राहकांना मोठा दिलासा! 24 तास अविरत सेवेमुळे देशभरात दिला पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा अखंडित पुरवठा
1

HPCL चा ग्राहकांना मोठा दिलासा! 24 तास अविरत सेवेमुळे देशभरात दिला पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा अखंडित पुरवठा

भारतात ‘इबोला’ व्हायरसचा हाय अलर्ट! केंद्र सरकारकडून ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी; आफ्रिकेत ‘ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी’ घोषित
2

भारतात ‘इबोला’ व्हायरसचा हाय अलर्ट! केंद्र सरकारकडून ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी; आफ्रिकेत ‘ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी’ घोषित

UPSC Prelims 2026:यूपीएससीचा ऐतिहासिक निर्णय! परीक्षा संपताच अवघ्या एका आठवड्यात ‘आन्सर की’ जाहीर होणार?
3

UPSC Prelims 2026:यूपीएससीचा ऐतिहासिक निर्णय! परीक्षा संपताच अवघ्या एका आठवड्यात ‘आन्सर की’ जाहीर होणार?

Iran Peace Deal: अमेरिका आणि इराण ६० दिवसांच्या सीझफायरवर सहमत; होर्मुझची सामुद्रधुनी होणार सर्वांसाठी खुली
4

Iran Peace Deal: अमेरिका आणि इराण ६० दिवसांच्या सीझफायरवर सहमत; होर्मुझची सामुद्रधुनी होणार सर्वांसाठी खुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.