Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात ‘इबोला’ व्हायरसचा हाय अलर्ट! केंद्र सरकारकडून ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी; आफ्रिकेत ‘ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी’ घोषित

आफ्रिकेत इबोला विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने WHO ने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने नागरिकांसाठी ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी करत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 24, 2026 | 05:26 PM
भारतात ‘इबोला’ व्हायरसचा हाय अलर्ट! (Photo Credit- X)

भारतात ‘इबोला’ व्हायरसचा हाय अलर्ट! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

  • भारतात ‘इबोला’ व्हायरसचा हाय अलर्ट!
  • केंद्र सरकारकडून ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी
  • आफ्रिकेत ‘ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी’ घोषित
नवी दिल्ली: जगावर पुन्हा एकदा एका अत्यंत जीवघेण्या आणि संसर्गजन्य महामारीचे संकट घोंगावू लागले आहे. आफ्रिकी देशांमध्ये ‘इबोला’ व्हायरसच्या (Ebola Virus Disease) रुग्णांमध्ये झालेली अचानक आणि वेगाने झालेली वाढ पाहता, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी’ (सार्वजनिक आरोग्य आणीबाणी) घोषित केली आहे. आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांच्या कडक तरतुदींनुसार ‘डब्लूएचओ’ने हा मोठा निर्णय घेतला आहे. जागतिक स्तरावर निर्माण झालेले हे गंभीर संकट आणि या विषाणूचा वाढता प्रसार लक्षात घेऊन भारत सरकार देखील पूर्णपणे हाय-अलर्ट मोडवर आले आहे.

कांगो आणि युगांडामध्ये इबोलाचा हाहाकार; ‘बुंडिबुग्यो स्ट्रेन’ ठरतोय जीवघेणा

आफ्रिकेतील रस्त्यांपासून ते रुग्णालयांपर्यंत इबोला विषाणूचे अत्यंत भयानक रूप पाहायला मिळत आहे. सध्या डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो (DRC) आणि युगांडा या आफ्रिकी देशांमध्ये या जीवघेण्या आजाराचे शेकडो संशयित रुग्ण समोर येत असून मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ‘आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ने (Africa CDC) संपूर्ण आफ्रिका खंडाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याचे सांगत सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे.

WHO Declares #Ebola Outbreak a Public Health Emergency of International Concern; Africa CDC Declares Public Health Emergency of Continental Security Government of India Advises Citizens to Avoid Non-Essential Travel to Democratic Republic of the Congo, Uganda and South Sudan… — PIB India (@PIB_India) May 24, 2026

सर्वात चिंतेची बाब म्हणजे, २०२६ मध्ये पसरत असलेल्या ‘बुंडिबुग्यो स्ट्रेन’ (Bundibugyo Strain) या इबोलाच्या नवीन प्रकारावर अद्याप कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा निश्चित औषधोपचार उपलब्ध नाही. त्यामुळे हा विषाणू अधिक घातक मानला जात आहे. या नवीन उद्रेकात आतापर्यंत ७०० हून अधिक संशयित रुग्ण आढळले असून २१६ लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, या संसर्गामध्ये मृत्यूदर (Mortality Rate) ३० ते ५० टक्क्यांपर्यंत आहे. इबोला संसर्गामुळे मानवी शरीरातील अनेक अवयव निकामी होतात. गंभीर प्रकरणांमध्ये शरीरांतर्गत रक्तस्त्राव (Internal Bleeding) होऊन रुग्णाचा मृत्यू होतो.

Cockroach Janta Party वर सरकारचा आणखी एक ॲक्शन? एक्सनंतर वेबसाईटही बंद

भारत सरकारकडून तातडीची ‘ट्रॅव्हल ॲडव्हायझरी’ जारी

इबोलाचा वाढता धोका लक्षात घेऊन भारताचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health and Family Welfare) पूर्णपणे सतर्क झाले असून नागरिकांसाठी तात्काळ ट्रॅव्हल ॲडव्हायझरी (प्रवास नियमावली) जारी केली आहे.

या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये भारतीय नागरिकांना डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांचा बिगर-गरजेचा (Non-essential) प्रवास टाळण्याचा कडक सल्ला देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती सामान्य होत नाही, तोपर्यंत या देशांचा प्रवास पुढे ढकलणे हाच सुरक्षित पर्याय असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता, इबोला विषाणूचा शोध पहिल्यांदा १९७६ मध्ये लागला होता. तेव्हापासून आतापर्यंत या जीवघेण्या विषाणूमुळे जगभरात १५,००० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

इबोला विषाणूपासून संरक्षणासाठी आरोग्य तज्ज्ञांचे महत्त्वाचे सल्ले

केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी काही आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे:

  • प्रवास टाळा: इबोला प्रभावित आफ्रिकी देशांमध्ये अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय प्रवास करणे पूर्णपणे टाळा.
  • वैयक्तिक स्वच्छता: गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, वारंवार हात स्वच्छ धुवा आणि मास्कचा वापर करा.
  • लक्षणे दिसल्यास सतर्कता: तीव्र ताप, प्रचंड अशक्तपणा, स्नायू दुखणे किंवा संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
  • अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा: सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता केवळ सरकार आणि ‘WHO’ने जारी केलेल्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या.
  • तपासणी बंधनकारक: आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात परतणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक राहील.

 CM Suvendu Adhikari यांचा ममता बॅनर्जींना मोठा दणका; बकरी ईदच्या सुट्टीबाबत घेतला ‘हा’ निर्णय

Web Title: Ebola virus alert india issues travel advisory after who declares global health emergency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 05:26 PM

Topics:  

  • Central Governement
  • Ebola
  • india
  • Travel
  • virus

संबंधित बातम्या

UPSC Prelims 2026:यूपीएससीचा ऐतिहासिक निर्णय! परीक्षा संपताच अवघ्या एका आठवड्यात ‘आन्सर की’ जाहीर होणार?
1

UPSC Prelims 2026:यूपीएससीचा ऐतिहासिक निर्णय! परीक्षा संपताच अवघ्या एका आठवड्यात ‘आन्सर की’ जाहीर होणार?

Post Office ची ‘ही’ स्कीम करेल कमाल, बिना रिस्क दरमहा 10000 रुपयांची खात्रीशीर कमाई
2

Post Office ची ‘ही’ स्कीम करेल कमाल, बिना रिस्क दरमहा 10000 रुपयांची खात्रीशीर कमाई

Ebola व्हायरसबाबत केंद्र सरकार सतर्क! देशातील सर्व विमानतळ आणि बंदरांवर ‘स्क्रीनिंग’ सुरू; कडक निर्देश जारी
3

Ebola व्हायरसबाबत केंद्र सरकार सतर्क! देशातील सर्व विमानतळ आणि बंदरांवर ‘स्क्रीनिंग’ सुरू; कडक निर्देश जारी

Underwater Tourism : स्कुबा डायव्हिंगपासून अंडरवॉटर फोटोग्राफीपर्यंत सर्व काही! सिंधुदुर्गात साकारतोय भव्य सागरी पर्यटन प्रकल्प 
4

Underwater Tourism : स्कुबा डायव्हिंगपासून अंडरवॉटर फोटोग्राफीपर्यंत सर्व काही! सिंधुदुर्गात साकारतोय भव्य सागरी पर्यटन प्रकल्प 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.