Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar Wheelchair oath : शरद पवारांची जिद्द अन् चिकाटीचे सर्वत्र कौतुक; व्हीलचेअरवरुन घेतली राज्यसभेची शपथ

राज्यसभेमध्ये 19 सदस्यांचा शपथ विधी सोहळा पार पडला आहे. यामध्ये जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्हीलचेअरवरुन संसदेमध्ये येत शपथ घेतली. त्यांची ही जिद्द आणि चिकाटी याचे सर्वांनी कौतुक केले.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 06, 2026 | 05:12 PM
Sharad Pawar took oath as a Member of Parliament on wheelchair Rajya Sabha oath-taking ceremony

Sharad Pawar took oath as a Member of Parliament on wheelchair Rajya Sabha oath-taking ceremony

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यसभेमध्ये 19 सदस्यांचा शपथविधी
  • शरद पवारांनी घेतली राज्यसभेची शपथ
  • व्हीलचेअरवर बसून शरद पवारांची शपथ
Sharad Pawar Rajya Sabha Oath-taking Ceremony : नवी दिल्ली : राज्यसभेमध्ये नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांतील सदस्यांनी गोपनियतेची शपथ घेतली. यामध्ये जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचा देखील समावेश आहे. लोकसभा आणि राज्यसभा मिळून शरद पवार यांनी 9 व्यांदा शपथ घेतली. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून पुन्हा एकदा शपथ घेतली. व्हीलचेअर बसून त्यांनी संसदेमध्ये प्रवेश केला आणि शपथ घेतली. (Political News)

देशातील चार महत्त्वाच्या राज्यांतून निवडून आलेल्या एकूण १९ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. देशाचे उपराष्ट्रपती आणि सभापती सी पी राधाकृष्णन यांनी शरद पवार यांच्यासह 19 खासदारांना शपथ दिली. यावेळी सत्ताधारी अनेक जेष्ठ नेते उपस्थित होते. या मंगल प्रसंगी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश आणि केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची प्रमुख उपस्थिती होते. महाराष्ट्रातील ज्योती वाघमारे, रामदास आठवले, माया इनावते यांनी शपथ घेतली. यावेळी शरद पवार यांच्या सातत्याचे आणि सामर्थ्याचे प्रतिक सर्वांना दिसून आले.

हे देखील वाचा : “…म्हणून काँग्रेसची महाराष्ट्रात दयनीय अवस्था; बारामती पोटनिवडणुकीवरुन पार्थ पवारांनी साधला निशाणा

या सोहळ्यातील सर्वाधिक चर्चेत असलेले व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार होते. प्रकृती अस्वास्थ्याची पर्वा न करता, पवार व्हीलचेअरवर सभागृहात आले आणि त्यांनी खासदार म्हणून पदाची शपथ घेतली. त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना अर्ज दाखल करता आला नव्हता. मात्र यानंतर त्यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली. व्हीलचेअरवर बसून त्यांनी घेतलेली शपथ ही अनेकांसाठी प्रेरणादायी घटना होती. या घटनेसह शरद पवार यांनी संसदीय कारकीर्दीची 59 वर्षे पूर्ण केली असून 60 व्या वर्षात पदार्पण केले असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

संसद भवन, दिल्ली येथे आज राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. pic.twitter.com/CJzC9ZjYnM — Sharad Pawar (@PawarSpeaks) April 6, 2026

हे देखील वाचा : डोक्यावर पदर, आडवं कुंकू अन् हातात संविधान; राज्यसभेतील शपथविधीला ज्योती वाघमारेंची सावित्रीमाईंना खास आदरांजली

ज्योती वाघमारेंनी वेधले लक्ष

चळवळीच्या कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या ज्योती वाघमारे यांनी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. यावेळी त्यांनी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा पेहराव केला होता. कपाळावर आडवं कुंकू, नऊवारी साडी आणि डोक्यावर पदर घेतलेल्या ज्योती वाघमारे यांनी सर्वांचे लक्ष वेधले. हातामध्ये संविधान घेऊन त्यांनी शपथ घेतली. त्यांनी शपथविधीवेळी महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांच्या नावाचा उल्लेख केला, मात्र शपथ घेताना कोणत्याही व्यक्तीचा उल्लेख न करण्याचा नियम असल्याने सभापती व उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना थांबवले. आणि ज्योती वाघमारे यांना पुन्हा एकदा शपथ घेण्यास सांगितले.

Web Title: Sharad pawar took oath as a member of parliament on wheelchair rajya sabha oath taking ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • Jyoti Waghmare
  • MP Sharad pawar
  • rajya sabha

संबंधित बातम्या

Jyoti Waghmare : डोक्यावर पदर, आडवं कुंकू अन् हातात संविधान; राज्यसभेतील शपथविधीला ज्योती वाघमारेंची सावित्रीमाईंना खास आदरांजली
1

Jyoti Waghmare : डोक्यावर पदर, आडवं कुंकू अन् हातात संविधान; राज्यसभेतील शपथविधीला ज्योती वाघमारेंची सावित्रीमाईंना खास आदरांजली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.