Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भगवान श्रीकृष्ण दिवसातून ५ वेळा नमाज पठण करायचे; मौलाना जरजिस अन्सारींच्या वादग्रस्त विधान, हिंदू संघटना आक्रमक

आपल्या वक्तव्यात मौलानांनी भगवद्गीतेतील या श्लोकाचा चुकीचा अर्थ लावला. वास्तविक पाहता, हा भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातील दहावा श्लोक आहे. या श्लोकाचा खरा अर्थ असा आहे:

  • By anuradha sagar
Updated On: Jul 16, 2026 | 03:25 PM
Maulana Jarjis, Lord Krishna, Bhagavad Gita, Mathura Controversy,

Maulana Jarjis, Lord Krishna, Bhagavad Gita, Mathura Controversy,

Follow Us
Follow Us:
  • उत्तर प्रदेशातील मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी स्थळावरून  वाद
  • श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करत असत.
  • मौलानांनी गीतेतील एका श्लोकाचा चुकीचा अर्थ लावला
 

Maulana Jarjis on Shri Krishna: मागील काही वर्षांपासून उत्तर प्रदेशातील मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी स्थळावरून सुरू असलेला वाद सुरु असतानाच मौलाना जरजिस अन्सारी यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. “भगवान श्रीकृष्ण धर्माने मुस्लिम होते. श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करत असत.” असं खळबळजनक विधान जरजीस यांनी केलं आहे. या वक्तव्यांनंतर, हिंदू संघटनांनी मौलाना जरजिस अन्सारी यांच्याविरोधात आक्रमक झाल्या असून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. (hindu-muslim politics)

आपल्या भाषणादरम्यान, मौलाना जरजिस अन्सारी यांनी श्रीमद् भगवद्गीतेतील एका श्लोकाचा उल्लेख करत ते म्हणाले की, श्रीमद् भगवद्गीतेत म्हटले आहे, “योगी युंजित् सततममनं रासि स्थितः। एकाकि यचित्त्तात्मा निराशिर्परिग्रहः।” मौलाना जरजिस यांनी दावा केला की, हा श्लोक भक्तांना संपूर्ण शरीराने पूजा करण्याचा निर्देश देतो. स्वतः भगवान श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा प्रार्थना करत असत.

Sonam Wangchuk Health Update: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

मौलानांनी गीतेतील एका श्लोकाचा चुकीचा अर्थ लावला

आपल्या वक्तव्यात मौलानांनी भगवद्गीतेतील या श्लोकाचा चुकीचा अर्थ लावला. वास्तविक पाहता, हा भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातील दहावा श्लोक आहे. या श्लोकाचा खरा अर्थ असा आहे: “आपले मन, शरीर आणि आत्मा सतत परमेश्वराला समर्पित करणे हे योग्याचे कर्तव्य आहे. त्याने एकांत स्थळी एकांतात राहावे आणि आपले मन व इंद्रिये नियंत्रित करून स्वतःला सर्व इच्छा आणि आसक्तींपासून मुक्त करावे.” या श्लोकात कुठेही नमाज किंवा इस्लामचा उल्लेख नाही.

मौलाना, आपली निराधार आणि निरर्थक वक्तव्ये मागे घ्या

एका व्हायरल व्हिडिओमध्ये, मौलाना जरजिस अन्सारी यांनी कथितरित्या दावा केला की, भगवान श्रीकृष्ण मुस्लिम होते आणि प्रार्थना करत असत. तेव्हापासून साकेत भवन मंदिराचे महंत सीताराम दास यांनी यावर आक्षेप घेत, “मला या कट्टरपंथी मौलवीला विचारायचे आहे की, हे कुठे लिहिले आहे? त्यांनी आपली निराधार आणि निरर्थक वक्तव्ये मागे घ्यावीत. अन्यथा, सनातनींमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण होईल. जोपर्यंत ते समाजाची आणि सनातनी समुदायाची माफी मागत नाहीत, तोपर्यंत आम्ही हे प्रकरण शांत बसू देणार नाही. मी सरकारला आवाहन करतो की, त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करावी.” असा इशारा दिला आहे.

‘मी मरणार नाही..’; व्हिडीओ जारी करत Sonam Wangchuk यांचे देशाला आवाहन

मौलानांच्या अटकेची मागणी

पण त्यांचे हे वक्तव्य बरेच जुने असल्याचे म्हटले जाते. श्री कृष्ण जन्मभूमी स्थळावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ते व्हायरल झाले आहे. मौलानांचे वक्तव्य व्हायरल होताच, हिंदू संघटनांनी आपला आक्षेप नोंदवला आहे. हिंदू संघटनांनी मौलानांवर कारवाई करण्याची आणि त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.

 

 

Web Title: Shri krishna janmabhoomi dispute maulana jarjis speech hindu organizations protest arrest demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • controversy
  • hindu-muslim politics
  • national news
  • Shri Krishna

संबंधित बातम्या

कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…
1

कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

One Nation One Election: एकाच वेळी ११ राज्यांत निवडणुकांची तयारी? २०२९ मध्ये देशात एकाच वेळी मतदान
2

One Nation One Election: एकाच वेळी ११ राज्यांत निवडणुकांची तयारी? २०२९ मध्ये देशात एकाच वेळी मतदान

ISRO Rocket Production: इस्रो आता रॉकेट बनवणार नाही!; खाजगी क्षेत्रासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचे दरवाजे खुले
3

ISRO Rocket Production: इस्रो आता रॉकेट बनवणार नाही!; खाजगी क्षेत्रासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचे दरवाजे खुले

Supreme Court News: मुलांना स्व-अर्जित संपत्तीतून बाहेर काढण्याचा पालकांना अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
4

Supreme Court News: मुलांना स्व-अर्जित संपत्तीतून बाहेर काढण्याचा पालकांना अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.