Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘इच्छामरणा’वरील हा होता सुप्रीम कोर्टाचा पहिला निर्णय! अरुणा शानबाग VS युनियन ऑफ इंडिया; भारतीय न्यायव्यवस्थेतील मैलाचा दगड!

2011 मधील अरुणा शानबाग प्रकरण हे भारतातील इच्छामरणावरील पहिले महत्त्वाचे सर्वोच्च न्यायालयीन प्रकरण ठरले. 42 वर्षे कोमात असलेल्या अरुणा शानबाग यांच्यासाठी दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने पॅसिव्ह युथनेशियाला मर्यादित मान्यता दिली. हा निर्णय भारतीय न्यायव्यवस्थेतील मैलाचा दगड मानला जातो.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 16, 2026 | 07:06 PM
‘इच्छामरणा’वरील हा होता सुप्रीम कोर्टाचा पहिला निर्णय! अरुणा शानबाग VS युनियन ऑफ इंडिया; भारतीय न्यायव्यवस्थेतील मैलाचा दगड!
Follow Us
Follow Us:

इच्छामरण जेवढा साधा शब्द आहे. तेवढाच अवघड याच्या मागचा अर्थ आणि त्याच्या अर्थावरून होणारे वेगळे आणि विक्षिप्त प्रकार आहेत, जे आताच्या काळात आपल्याला म्हणजे जनसामान्यांना विचार करायला भाग पाडतात. इच्छा मरण ज्याचा थोडक्यात अर्थ म्हणजे स्वतःच्या इच्छेने पत्करलेले मरण. वास्तविकपणे याचा आपण विचार करायला गेलं तर समाधी, आत्मसमर्पण, आत्महत्या, आत्मघात हे सर्व एका प्रकारे इच्छामरणच. त्यांच्या मागची कारणे वेगळी असू शकतात. मग ती आध्यात्मिक असतील, धार्मिक असतील, वैद्यकीय असतील किंवा आत्मघातकीही असतील. अशीच एक संकल्पना म्हणजे (Euthanasia) युथनेशिया, मराठीत बोललं तर इच्छामरण. म्हणजे वेदना आणि सहसा शारीरिक असह्यता दुःख दूर करण्यासाठी जाणून-बुजून आयुष्य संपवण्याची पद्धत.

याचे तसे दोन प्रकार पडतात ऍक्टिव्ह एथनेशिया आणि पॅसिव युथनेशिया. एक्टिव युथनेशिया याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूसाठी विशिष्ट पद्धतीने केल्या जाणाऱ्या कार्यप्रणालीचा समावेश होतो. यात त्या व्यक्तीला औषधांचा किंवा विषाचा जास्त मात्रेचा डोस देऊन त्या व्यक्तीचं आयुष्य संपविण्यात येत. पॅसिव युथनेशियामध्ये त्या व्यक्तीच्या मेडिकल ट्रीटमेंट काढून टाकण्यात येतात, ज्याच्या आधारे ती व्यक्ती कृत्रिमरीत्या श्वास घेत असेल किंवा जिवंत असेल. या दोन्ही मधील मुख्य फरक म्हणजे ऍक्टिव्ह युथनेशिया मृत्यूसाठी जबरन उचललं जाणार पाऊल आहे तर पॅसिव युथनेशिया मृत्यूला नैसर्गिकरित्या येण्यासाठीचा अट्टहास आहे. तरीही सारांशमध्ये दोन्हींचा मूळ उद्देश मृत्यू हाच खरा.

लग्नाआधीचे शरीरसंबंध चारित्र्यावर ‘डाग’ नव्हे; अविवाहित प्रौढांबाबतीत खंडपीठाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

भारताच्या संविधानात ऍक्टिव्ह युथनेएशियाचा प्रत्यक्ष उल्लेख नसला; तरी सुप्रीम कोर्टाच्या बऱ्याच निर्णयांवरून हे नेमकं स्पष्ट होतं की, भारताचे संविधान कोणत्याही प्रकारच्या सक्रिय इच्छामरणाला म्हणजेच ऍक्टिव्ह युथनेशियाला बेकायदेशीर मानत. संविधानाचे कलम 21 प्रत्येक भारतीय नागरिकाला सन्मानाने आपले जीवन व्यक्तिगत रित्या जगण्याचा हक्क देते. तरीही संविधानाने एका अर्थी मृत्यूचा हक्क कोणालाच दिलेला नाही. अशा कोणत्याही प्रकारच्या गोष्टीला सेक्शन 302, 366 अंतर्गत आत्महत्या आणि खुनाच्या गुन्ह्यामध्ये खटले चालवण्याचे आदेश संविधान आणि सुप्रीम कोर्ट देत.

याच्या काही प्रसिद्ध केसेस पाहायला गेलं तर त्यात सर्वात पहिली येते ती म्हणजे अरुणा शानबाग VS युनियन ऑफ इंडिया 2011, ही केस. भारताच्या युथनेशीया संदर्भातील ही केस कोर्टाच्या भक्कम निर्णयाचे प्रतीक आहे. अरुणा शान बाग मुंबईमधील किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नर्सचेकाम करायच्या. 27 नोव्हेंबर 1973 ला हॉस्पिटलच्या सोहनलाल भरत या वार्डबॉयने अरुणा यांच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि एका साखळीने त्यांचा गळा घोटला. ज्याच्यामुळे त्यांच्या मेंदूला पोहोचणारा ऑक्सिजनचा सप्लाय तुटला व मोठ्या प्रमाणात ब्रेन डॅमेज झाले. या सगळ्यामुळे त्या जवळजवळ 42 वर्षांसाठी ‘परमनंट व्हेजिटेटीव स्टेट’ म्हणजेच पीव्हीएस म्हणजेच एका अर्थी कोमा मध्ये होत्या.

प्रेमसंबंध लग्नापर्यंत पोहोचले नाहीत म्हणून फसवणूक ठरत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

2009 मध्ये जरनलिस्ट आणि लेखक पिंकी वीराणी यांनी अरुणा यांचा हा मोठा वेदना काळ संपवण्यासाठी सुप्रीम कोर्टात युथनेशियाची याचिका दर्जी केली. 7 मार्च 2011 ला सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला या जजमेंट नुसार सुप्रीम कोर्टाने अरुणा यांना ऍक्टिव्ह नाही तर पॅसिव युथनेशियाचा अवलंब करून त्यांच्या सर्व मेडिकल ट्रीटमेंट्स आणि लाईव्ह सपोर्ट काढून त्यांना या कोमामधील वेदनातील आयुष्य संपवण्याची अनुमती दिली. याचबरोबर या जजमेंटने हेही स्पष्ट केलं की कोणत्याही प्रकारच्या ऍक्टिव्ह युथनेशियाला भारतात गुन्हा समजले जाईल. 18 मे 2015 ला अरुणा शानबाग यांचा मृत्यू नैसर्गिकपणे न्युमोनियामुळे झाला.

Web Title: Sppreme courts first judgement on euthanasia practice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 07:06 PM

Topics:  

  • Supreme Court

संबंधित बातम्या

Gokul Election : गोकुळच्या 492 संस्थांचं मतदान धोक्यात? सर्वोच्च न्यायालयात धाव; निवडणुकीआधी मोठी खळबळ
1

Gokul Election : गोकुळच्या 492 संस्थांचं मतदान धोक्यात? सर्वोच्च न्यायालयात धाव; निवडणुकीआधी मोठी खळबळ

CJI On Executive Magistrate Notice: न्यायालयाचा आदेश डावलण्याचे धाडस कसे झाले? ५ लाखांच्या नोटिसीवरून सरन्यायाधीश सूर्यकांत भडकले
2

CJI On Executive Magistrate Notice: न्यायालयाचा आदेश डावलण्याचे धाडस कसे झाले? ५ लाखांच्या नोटिसीवरून सरन्यायाधीश सूर्यकांत भडकले

Supreme Court News: डॉक्टरांवरील हल्ल्यांवरून सर्वोच्च न्यायालय आक्रमक; राजकीय कार्यकर्त्यांवर कडक कारवाईचे आदेश
3

Supreme Court News: डॉक्टरांवरील हल्ल्यांवरून सर्वोच्च न्यायालय आक्रमक; राजकीय कार्यकर्त्यांवर कडक कारवाईचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.