Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court on Missing Children: मुलांच्या अपहरणामागे मोठं रॅकेट? सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला चपराक; म्हणाले…

देशभरात मुले बेपत्ता होण्यामागे एखादं मोठं नेटवर्क आहे का? सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून गेल्या ६ वर्षांचा डेटा सादर करण्यास सांगितले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 10, 2026 | 06:55 PM
मुलांच्या अपहरणामागे मोठं रॅकेट? सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला चपराक; म्हणाले... (Photo Credit- X)

मुलांच्या अपहरणामागे मोठं रॅकेट? सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला चपराक; म्हणाले... (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • देशभरात मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले!
  • सर्वोच्च न्यायालयाने ओढले राज्यांचे कान
  • ६ वर्षांचा डेटा मागवला
Supreme Court on Missing Children Case: देशभरातून मुले बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांची सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या घटनांमागे एखादे देशव्यापी आणि संघटित गुन्हेगारी नेटवर्क (Organized Network) कार्यरत आहे का, याचा शोध घेण्याचे आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. मुलांच्या सुरक्षेशी संबंधित हा मुद्दा अत्यंत संवेदनशील असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत.

विशिष्ट ‘पॅटर्न’ शोधण्याचे न्यायालयाचे आदेश

न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी करताना महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. “मुलांचे अपहरण ही केवळ एक सुटी घटना आहे की त्यामागे काही विशिष्ट ‘पॅटर्न’ किंवा टोळी काम करत आहे, हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे,” असे खंडपीठाने म्हटले आहे. यासाठी सर्व राज्यांकडून तातडीने माहिती गोळा करण्याचे निर्देश केंद्राला देण्यात आले आहेत.

Supreme Court asked the Centre to ascertain whether there is a nationwide network or state-specific group behind the incidents of #children going missing from different parts of the country. A bench of Justices B.V Nagrathna and Ujjal Bhuyan emphasised the need to ascertain… pic.twitter.com/9euH0ntgst — All India Radio News (@airnewsalerts) February 10, 2026

Manipur violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! घरांची जाळपोळ, ५ दिवसांसाठी इंटरनेट बंद, अंदाधुंद गोळीबारानंतर संचारबंदी लागू

निष्काळजी राज्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा

सुनावणीदरम्यान केंद्राने माहिती दिली की, काही राज्ये अद्याप बेपत्ता मुलांचा डेटा सामायिक करण्यास टाळाटाळ करत आहेत. यावर न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला. गेल्या ६ वर्षांचा संपूर्ण रेकॉर्ड संकलित करून तो महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वेबसाईटवर अपलोड करावा. जे राज्य माहिती देण्यास सुस्ती दाखवतील, त्यांच्याविरोधात कठोर आदेश काढले जातील, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

सुटका केलेल्या मुलांच्या मुलाखती घेण्याची सूचना

गुन्हेगारांच्या टोळीपर्यंत पोहोचण्यासाठी न्यायालयाने सरकारला एक मोलाचा सल्ला दिला आहे. ज्या मुलांची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे, त्यांच्या मुलाखती घ्याव्यात. या मुलांशी संवाद साधल्यास गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीची (Modus Operandi) माहिती मिळेल. तसेच, अपहरणामागचा मुख्य हेतू (भिक मागणे, मानवी तस्करी इ.) स्पष्ट होईल. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करता येईल.

Rahul Gandhi : ‘माजी लष्करप्रमुख खोटे बोलत नाहीत’, नरवणे यांच्या पुस्तकावरून राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Web Title: Supreme court directs centre to probe organized network behind missing children india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • Central Governement
  • child
  • Supreme Court

संबंधित बातम्या

पर्यटनात Maharashtra देशात ‘नंबर १’! परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीने वाढ; केंद्र सरकारची माहिती
1

पर्यटनात Maharashtra देशात ‘नंबर १’! परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीने वाढ; केंद्र सरकारची माहिती

फक्त चौकशीसाठी पोलिस कोणालाही अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
2

फक्त चौकशीसाठी पोलिस कोणालाही अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

अनुराग ठाकूर होणार BCCI चे नवे अध्यक्ष? मिथुन मनहासचे पद धोक्यात? सर्वोच्च न्यायालयाने ‘त्या’ प्रकरणात 9  वर्षांची बंदी उठवली
3

अनुराग ठाकूर होणार BCCI चे नवे अध्यक्ष? मिथुन मनहासचे पद धोक्यात? सर्वोच्च न्यायालयाने ‘त्या’ प्रकरणात 9  वर्षांची बंदी उठवली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.