Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court News: बाल लैंगिक शोषणाची तक्रार दडपणे पडणार महाग! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयाने केवळ मुख्याध्यापिकेविरोधातील खटला पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. प्राचार्य, शिक्षक आणि वसतिगृह अधीक्षिका यांच्याविरोधातील आरोपमुक्ती कायम ठेवण्यात आली. कारण, पीडित मुलीकडून घटनेची थेट माहिती केवळ मुख्याध्यापिकेलाच मिळाली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 10, 2026 | 04:00 PM
Supreme Court, POCSO Act, Child Safety

Supreme Court, POCSO Act, Child Safety

Follow Us
Follow Us:
  • अनेकदा शाळा स्वतःची बदनामी टाळण्यासाठी अशा घटना दाबून ठेवतात
  • या खटल्यात मुख्याध्यापकांची झालेली निर्दोष मुक्तता सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली
  • शाळा ही मुलांसाठी सर्वात सुरक्षित जागा मानली जाते, त्यामुळे तिथे होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्वरित कायदेशीर पावले उचलणे हेच संस्थाचालकांचे मुख्य कर्तव्य
Supreme Court News:  “शाळेच्या मुख्याध्यापक किंवा शाळा प्रशासनाला जर बाल लैंगिक शोषणाची तक्रार मिळाली, तर त्याची तक्रार करणे ही त्यांची जबाबदारी आहे. ते स्वतःहून तपास करू, असा दावा करून हे प्रकरण फेटाळून लावू शकत नाहीत.’ असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात दिला आहे. या प्रकरणात न्यायालयाने मांडलेले महत्त्वाचे मुद्देही जाणून घेणे आवश्यक आहे.

बाल लैंगिक शोषणाप्रकरणी एका खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्वाळा दिला आहे. “जर शाळेच्या अधिकाऱ्याला बाल लैंगिक शोषणाची तक्रार मिळाली, तर ते केवळ तपास करून प्रकरण फेटाळून लावू शकत नाहीत. अधिकारी या घटनेची तक्रार करण्याच्या आपल्या जबाबदारीतून पळ काढू शकत नाहीत. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, २०१२ च्या कलम १९ अंतर्गत घटनेची तक्रार करण्यात अयशस्वी झाल्यास, पॉक्सो कायद्याच्या कलम २१ अंतर्गत फौजदारी जबाबदारी येते, ज्यासाठी सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो.” असे न्यायालयाने म्हटले आहे.

Supreme Court on Ram Mandir Scam: राम मंदिर ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार? सर्वोच्च न्यायालयाचे मोठे पाऊल

प्रकरण काय आहे?

एका सिनियर विद्यार्थ्याने आठ वर्षांच्या विद्यार्थिनीवर केलेल्या बलात्काराचा प्रकार उघडकीस आला होता. पण शाळेच्या मुख्याध्यापकांकडून या प्रकरणाची तक्रार दडपल्याचा आरोप करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने या प्रकरणात मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता रद्द केली आहे.

तसेच, जर शाळेच्या अधिकाऱ्याला मुलाच्या लैंगिक शोषणाची तक्रार मिळाली, तर ते तपास करून काहीही घडले नाही असा निष्कर्ष काढू शकत नाहीत. अधिकारी घटनेची माहिती देण्याच्या आपल्या जबाबदारीतून पळ काढू शकत नाहीत, असंही न्यायालयाने म्हटले आहे.

पीडित मुलीने आठवीतील विद्यार्थ्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रथम तिच्या बहिणीला, नंतर हेड गर्लला आणि अखेरीस मुख्याध्यापिकेला सांगितले होते. मात्र, पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याऐवजी मुख्याध्यापिकेने स्वतः चौकशी केली. आरोपी विद्यार्थ्याची चौकशी, मुलीची वैद्यकीय स्वरूपाची तपासणी आणि काही दिवस निरीक्षण केल्यानंतर “असा प्रकार घडलेला नाही” असा निष्कर्ष काढत हे प्रकरण दडपल्याचा आरोप आहे.

‘E20’ इंधनामुळे गाड्यांचे मायलेज घटणार? पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्टच सांगितले; ‘हे’ मोठे फायदे वाचून व्हाल थक्क…

‘मिनी ट्रायल’ घेणे चुकीचे

सर्वोच्च न्यायालयाने ट्रायल कोर्ट आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयावरही ताशेरे ओढले. आरोप निश्चित करण्याच्या टप्प्यावर केवळ प्रथमदर्शनी पुरावे (Prima Facie Case) तपासणे अपेक्षित असताना, दोन्ही न्यायालयांनी बचाव पक्षाच्या युक्तिवादांचा विचार करून जणू “मिनी ट्रायल”च घेतल्याचे न्यायालयाने नमूद केले.

इतर अधिकाऱ्यांना दिलासा

सर्वोच्च न्यायालयाने केवळ मुख्याध्यापिकेविरोधातील खटला पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. प्राचार्य, शिक्षक आणि वसतिगृह अधीक्षिका यांच्याविरोधातील आरोपमुक्ती कायम ठेवण्यात आली. कारण, पीडित मुलीकडून घटनेची थेट माहिती केवळ मुख्याध्यापिकेलाच मिळाली होती.

तसेच, पीडितेची बहीण, मैत्रीण आणि हेड गर्ल या सर्व अल्पवयीन असल्याने POCSO कायद्यानुसार त्यांच्यावर माहिती न दिल्याबद्दल कारवाई होऊ शकत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

 

Web Title: Supreme court overturns principal acquittal in school pocso case section 21

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Supreme Court

संबंधित बातम्या

Supreme Court on Ram Mandir Scam: राम मंदिर ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार? सर्वोच्च न्यायालयाचे मोठे पाऊल
1

Supreme Court on Ram Mandir Scam: राम मंदिर ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार? सर्वोच्च न्यायालयाचे मोठे पाऊल

OBC Reservation: ओबीसी आरक्षण आणि मुस्लिम धर्मांतर! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष; पाहा कायदेशीर बाजू
2

OBC Reservation: ओबीसी आरक्षण आणि मुस्लिम धर्मांतर! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष; पाहा कायदेशीर बाजू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.