अंबाला : आंदोलनाच्या 12 व्या दिवशी सुद्धा पंजाबच्या शेतकऱ्यांनी शंभू आणि खनौरी सीमेवर तळ ठोकला होता. शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा निर्णय 29 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलला आहे. त्याच दिवशी याबाबत निर्णय घेणार असल्याचे शेतकरी नेते सर्वन पंढेर यांनी सांगितले.
हरियाणातील 7 जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेटवरील बंदी 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 पर्यंत वाढवण्यात आली आहे. बेपत्ता झालेले शेतकरी प्रितपाल यांना रोहतक पीजीआयमध्ये दाखल केल्याची माहिती मिळाल्यानंतर पंजाबचे मुख्य सचिव अनुराग वर्मा यांनी हरियाणाचे मुख्य सचिव संजीव कौशल यांना पत्र लिहिले आहे.
ट्रॅक्टर उलटला; एक ठार
एमएसपीसह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे केंद्राविरोधात आंदोलन सुरूच आहे. याच दरम्यान, पंजाबात शनिवारी आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी फिरोजपूरहून शंभू सीमेवकडे जात असलेली एक ट्रॅक्टर ट्रॉली बसंतपुरा गावजवळ उलटली. या अपघातात एक शेतकरी गुरजंट सिंह याचा मृत्यू झाला तर दोन अन्य जखमी झाले आहेत.