अहमदाबाद : आम आदमी पक्षाचे (Aap) राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी सोमवारी अहमदाबादमध्ये (Ahmedabad) रिक्षाचालकाच्या घरी भोजन केले. मात्र, अरविंद केजरीवाल रिक्षाचालकाच्या (Autodrivers Home Dinner) घरी जात असताना पोलिसांनी सुरक्षेच्या (Police Security) कारणास्तव त्यांना रोखले. यावेळी केजरीवाल यांनी पोलिसांना ‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे’ अशा शब्दात सुनावले.
Gujarat के Auto वाले के निमंत्रण पर @ArvindKejriwal जी गए उनके घर!
परिवार वालों को नहीं हुआ विश्वास!#KejriwalRukegaNahin pic.twitter.com/iqG0QLvWDI
— AAP (@AamAadmiParty) September 12, 2022
अरविंद केजरीवाल भोजनाचे निमंत्रण स्विकारून रिक्षातून रात्री साडेसातच्या सुमारास निघाले होते. त्यामुळे पोलिसांनी रिक्षा रोखल्याने अरविंद केजरीवाल संतापले. पोलीस त्यांना सुरक्षेचा मुद्दा असल्याचे सांगितले. पण त्यांनी आपल्याला सुरक्षेची गरज नाही सांगत ती नाकारली. अखेर रिक्षाचालकाच्या शेजारी एका पोलीस कर्मचाऱ्याला बसवून दोन पोलिसांच्या गाड्यांचा ताफा घेऊन अरविंद केजरीवाल रवाना झाले.
“I am a public man, I live in public, I don’t want your security”
Gujarat Police stopped Arvind Kejriwal.#KejriwalRukegaNahin pic.twitter.com/TcI9jbDF7E
— Amit Palekar (@AmitPalekar10) September 12, 2022
जनतेमध्ये जाताना प्रोटोकॉल कशासाठी हवा? तुमचे नेते जनतेमध्ये जात नाहीत, म्हणून ते दुखी आहेत, असा संताप व्यक्त केजरीवालांनी व्यक्त केला. नेत्यांना सांगा थोडे प्रोटोकॉल तोडा आणि जतेनमध्ये जा, असा सल्लाही दिला. आम्हाला तुमची सुरक्षा नको, तुमची सुरक्षा मंत्र्यांना द्या असेही ते म्हणाले.