नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातून एक मोठी व महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यपाल (Governor) नियुक्त 12 आमदारांच्या (MLA) प्रकरणात आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात (Court) सुनावणी पार पडली आहे. आता राज्यपाल (Governor) नियुक्त 12 आमदारांवरील स्थगिती उठवली आहे. सप्टेंबर 2022 पासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तींना कोर्टात स्थगिती देण्यात आली होती. आज ही स्थगिती उठवली गेली आहे. या आधी न्यायमूर्ती जोसेफ यांच्यासमोर ही केस सुरू होती. पण ते निवृत्त झाल्यानंतर आता ही केस सरन्यायाधीशांसमोर सुनावणीसाठी आली आहे.