फोटो सौजन्य - (अरूण योगीराज ट्विटर)
जानेवारी २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. तब्बल ५०० वर्षांपासूनची राम भक्तांचे स्वप्न पूर्ण झाले. रामलल्ला आपल्या भव्य मंदिरात विराजमान झाले. दरम्यान अयोध्येतील राम मंदिरात अतिशय देखणी आणि सुंदर अशी रामलल्लाची मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे आणि ही सुबक मूर्ती साकारली होती ती अरुण योगीराज यांनी. दरम्यान अरुण योगीराज यांना एका कार्यक्रमासाठी अमेरिकेला जायचे होते. मात्र त्यांचा अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात आला आहे ..
मिळालेल्या माहितीनुसार, रामलल्लाच्या मूर्तीचे शिल्पकार अरुण योगीराज, त्यांचा मुलगा आणि पत्नी यांचा अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात आला आहे. दरम्यान अमेरिकन दूतावासाने व्हिसा नाकारण्याचे कारण स्पष्ट केलेले नाही. अरूण योगीराज यांनी कन्नड कुटूस असोसिएशन ऑफ अमेरिका आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज केला होता.
अरूण योगीराज यांना कन्नड कुटूस असोसिएशन ऑफ अमेरिका आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमेरिकेला जायचे होते. यासाठी त्यांना अमेरिकेचा व्हिसा लागणार होता. जागतिक कन्नड परिषदेत सहभागी होण्यासाठी अर्ज केलेल्या योगीराज यांना मोठा धक्का समजला जात आहे. दरम्यान व्हिसा नाकारल्याने योगीराज यांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान अमेरिकन दूतावासाने व्हिसा नाकारण्याचे कारण स्पष्ट केले नाहीये. त्यामुळे व्हिसा नाकारला जाणार हे अरूण योगीराज यांनी अनपेक्षित असल्याचे म्हटले आहे.