संसदेतील सुरक्षा भंगप्रकरणी मोठी अपडेट, सहावा आरोपी महेश कुमावतही अटक

सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे, नीलम आझाद आणि ललित झा या पाच आरोपींनी सुरक्षा यंत्रणांना अनेक महत्त्वाची माहिती दिली आहे. पोलिसांनी सहाव्या आरोपीलाही अटक केली आहे.

  संसदेतील सुरक्षा भंगप्रकरणी (Parliament Security Breach) मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली होती. आता प्रकरणातील सहावा आरोपी संसदेत घुसखोरीची योजना आखणारा आरोपी महेश कुमावत यालाही अटक करण्यात आली आहे. घटनेपासून हा आरोपी फरार होता. आता या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मास्टरमाइंड ललित झा याने महेश आणि कैलाश नावाच्या दोन तरुणांचीही नावे घेतली होती.

  मास्टरमाइंडने केला धक्कादायक खुलासा

  संसदेच्या सुरक्षेचा भंग करणारा मास्टरमाईंड ललित झा याने सुरक्षा यंत्रणांना सांगितले आहे की, त्याला अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करायचा होता. आपली मागणी सरकारकडून पूर्ण करून घ्यायची असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दिल्ली पोलिसांनीही या गोष्टी न्यायालयाला सांगितल्या आहेत. आरोपींच्या चौकशीदरम्यान, हे देखील समोर आले आहे की त्यांनी 13 डिसेंबरची तारीख जाणूनबुजून निवडली होती कारण त्यांना 2001 चा हल्ला पुन्हा घडवायचा होता. सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे, नीलम आझाद आणि ललित झा या पाच आरोपींनी सुरक्षा यंत्रणांना अनेक महत्त्वाची माहिती दिली आहे. पोलिसांनी सहाव्या आरोपीलाही अटक केली आहे.

  संसदेत काय घडलं होतं?
   
  बुधवारी लोकसभेत सागर शर्मा आणि मनोरंजन डी या दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात उडी मारली आणि स्प्रे फवारून घोषणाबाजी केली. त्याचवेळी संसद भवनाबाहेर अमोल शिंदे आणि नीलम यांनीही स्प्रे फवारत घोषणाबाजी केली. ‘हुकूमशाही चालणार नाही’ अशा घोषणा दिल्या. या घटनेनंतर सगळीकडे एकच गोंधळ उडाला. सागर, मनोरंजन, अमोल, नीलम आणि विशालला पोलिसांनी ताब्यात घेतले होते तर सहावा आरोपी ललित हा फरार होता. त्याला शोधण्यसाठी पोलिसांची एक टिम त्याच्या मागावर होती अखेर त्याने आत्मसमर्पण केले आहे.
  सहा जणांनी या घटनेचा कट रचला
  संसद घुसखोरी प्रकरणात सहापैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सहा जणांनी या घटनेचा कट रचल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले होते. संसदेत घुसलेले हे सहा जण दीड वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते एकमेकांशी जोडले गेले. संसदेत येण्यापूर्वी त्यांनी रेकी केली होती.