मागील अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेला राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. जाहीर करण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यंना पाहता येणार आहे. राष्ट्रीय लोकसेवा आयोग २०२३ च्या परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तव हा देशात प्रथम आला आहे. या परीक्षेचा निकाल तुम्हाला upsc.gov.in या बेवसाईट्वर पाहता येणार आहे.
यूपीएससी परीक्षांचा निकाल जाहीर
राष्ट्रीय लोकसेवा आयोग ही परीक्षा २०२३ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तव हा प्रथम असा असून अनिमेष प्रधान दुसरा, दोनुरु अनन्या रेड्डी तिसऱ्या, पीके सिद्धार्थ रामकुमार चौथ्या आणि रुहानी पाचव्या क्रमांकावर आहे. २०२३ मध्ये ११४३ जागांसाठी यूपीएससी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर त्यातील १०१६ स्पर्धकांची शिफारस करण्यात आली. त्यामध्ये ३४७ जनरल कॅटेगरी, ११५ ईबीएस, ३०३ ओबीसी, १६४ एससी, ८६ एसटी या सर्व प्रवर्गांचा समावेश होता. ३५५ जण प्रोविजनल लिस्टमध्ये ठेवण्यात आले आहेत.
परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पुढील १५ दिवसांनी मार्क्स निकाल जाहीर केला जाणार आहे. ९ एप्रिल २०२४ ला यूपीएससीच्या परीक्षेची मुलाखत घेण्यात आली होती. यामध्ये २८४६ मुख्य परीक्षेमध्ये पास झालेल्या उमेदवारांना बोलावण्यात आले होते. १८० आयएएस, २०० आयपीएस आणि ३७ आयएफएस या रिक्त पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती.
यूपीएससीमधील टॉपर लिस्ट
2629523 – आदित्य श्रीवास्तव
6312512 – अनिमेष प्रधान
1013595 – डोनुरु अनन्या रेड्डी
1903299 – पी के सिद्धार्थ रामकुमार
6312407 – रूहानी
0501579 – सृष्टि डबास
3406060 – अनमोल राठौड़
1121316 – आशीष कुमार
6016094 – नौशीन
2637654 – ऐश्वर्यम प्रजापति
6500593 – कुश मोटवानी
5818509 – अनिकेत शांडिल्य
0813845 – मेधा आनंद
0867419 – शौर्य अरोड़ा
2205311 – कुणाल रस्तोगी
0415007 – अयान जैन
0838034 – स्वाति शर्मा
5818283 – वरदा खान
0331058 – शिवम कुमार
5804350 – आकाश वर्मा
1101464 – पुरूराज सिंह सोलंकी
8500883 – अंशुल भट्ट
0308283 – सौरभ शर्मा
5301033 – प्रजानन्दन गिरि
6207400 – रितिका वर्मा
6406864 – रूपल राणा
1026031 – नंदाला सैकिरण
0500060 – पवन कुमार गोयल
6311776 – सलोनी छाबड़ा
3516118 – गुरलीन
1904851 – विष्णु शशिकुमार
3402529 – अर्जुन गुप्ता
1418091 – रितिका आइमा
1530610 – ज़ुफ़िशान हक
0861853 – अभिनव जैन






