धाराशिवमध्ये महिलांना स्वावलंबी करण्याचा संकल्प; रोजगारासाठी अर्थसहाय्य व शहर विकासाच्या घोषणा
धाराशिव : धाराशिव शहरातील प्रत्येक वार्डातून पाच प्रभागातून दहा महिलांना स्वयंरोजगारासाठी स्वावलंबी करण्यासाठी पंतप्रधान मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून अर्थसहाय्य मिळवून देऊ, त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यास मदत करणार, तसेच शहरातील कचरा संकलनासाठी वीस घंटागाड्या देण्याचे व हातलाई तलावावर म्युझिकल फाउंटन करणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा अर्चना पाटील यांनी दिली आहे.
धाराशिव नगरपरिषदेच्या महिला बालकल्याण विभागाने आयोजित केलेल्या नारीशक्तीच्या सन्मान सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या. जागतिक महिला दिनानिमित्त धाराशिव नगरपालिकेच्या महिला, बालकल्याण विभागाच्यावतीने २४ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित नारीशक्तीचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या ३० महिलांचा सन्मानचिन्ह, मोगऱ्याचे रोप व शाल देऊन अर्चना पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी कळंबच्या नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे, धाराशिव पंचायत समितीच्या सभापती गोकर्णा गोपाळ कदम, मुख्याधिकारी नीता अंधारे या प्रमुख अतिथी होत्या. प्रास्ताविक महिला बालकल्याण विभागाच्या उपसभापती दिपाली पाटील तर आभार वैशाली सोनवणे यांनी मानले. सूत्रसंचालन वैशाली आव्हाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिला व बालकल्याण विभागाचे सर्व कर्मचारी, सर्व नगरसेवकांनी परिश्रम घेतले.
दरम्यान धाराशिवमध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी महत्त्वाचा पुढाकार घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी दिली. शहरातील प्रत्येक वॉर्ड व प्रभागातून महिलांची निवड करून पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेतून त्यांना अर्थसहाय्य देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासोबतच शहराच्या स्वच्छतेसाठी २० नवीन घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात येणार असून, हातलाई तलावावर म्युझिकल फाउंटन उभारण्याचीही घोषणा करण्यात आली. या उपाययोजनांमुळे शहर विकासाला चालना मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
ही माहिती धाराशिव नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने आयोजित केलेल्या नारीशक्ती सन्मान सोहळ्यात देण्यात आली. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ३० महिलांचा सन्मानचिन्ह, शाल व मोगऱ्याचे रोप देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
तिकीट गैरवापर रोखण्यासाठी रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; आता खऱ्या प्रवाशांना मिळणार दिलासा






