२० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, सर्व ट्रेन रद्द; प्रयागराजमध्ये भाविकांचा महापूर, पाय ठेवायलाही जागा नाही
प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यातील भाविकांची गर्दी गेल्या काही दिवसांपासून कमी झाल्याचं वृत्त होतं. आखाड्यांचे साधू आणि संतही शाहीस्नानानंतर परतत आहेत. मात्र आता पुन्हा एकदा लाखो भाविक महाकुंभसाठी प्रयागराजमध्ये पोहोचले आहेत. प्रयागराजमध्ये २० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे स्टेशनचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाने सर्व गाड्या रद्द केल्या आहेत.
प्रयागराज में भीषण जाम लगा हुआ है, सड़क पर वाहनों की लंबी कतारें लगी है। लोगों को पैदल चलने की जगह नहीं है।
ट्रैफिक व्यवस्था पूरी तरह ध्वस्त हो चुकी है। @kumbhMelaPolUP #kumbh #mela #prayagraj pic.twitter.com/AUmgeTACXr— जय कृष्णा / Jay Krishna (@JaykrishnaPTI) February 9, 2025
प्रयागराजकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी आहे. परिस्थिती अशी आहे की मुले, वृद्ध आणि इतर भाविक वाहतूक कोंडीत अडकले आहेत. त्यांनी पाणी आणि अन्नही मिळत नाही आहे. यावर सपा सुप्रीमो अखिलेश यादव यांनीही ट्विट करून लोकांसाठी तात्काळ व्यवस्था केली जाईल असे म्हटले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, महाकुंभात सर्वत्र भुकेले, तहानलेले, दुःखी आणि थकलेले यात्रेकरू दिसतात. त्यांनी राज्य सरकारला मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहण्याचे आणि तातडीने व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे.
प्रयागराज रेल्वे स्थानकावरील गर्दी पाहता, सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानकात अडकलेले भाविक रेल्वे ट्रॅकवरूनच त्यांच्या गंतव्यस्थानाकडे जात आहेत. अखिलेश यादव यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये हजारो लोक रस्त्यावर अडकलेले दिसतात आणि वाहने मध्येच अडकलेली दिसतात. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी राज्य सरकारला महाकुंभमेळ्यात अडकलेल्या लाखो भाविकांसाठी आपत्कालीन व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे.
अखिलेश यादव यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे, या पोस्टमध्ये त्यांनी दावा केला आहे की लखनौच्या बाजूने ३० किलोमीटर जाम आहे, तर रेवा रोडच्या बाजूने १६ किलोमीटर जाम आहे. वाराणसीपासून १२-१५ किलोमीटर अंतरावर आधीच वाहतूक कोंडी आहे. स्टेशनवर इतकी गर्दी आहे की लोक ट्रेनच्या इंजिनमध्येही घुसले. इतक्या मोठ्या गर्दीत लोकांना त्रास होत आहेच, पण शहरातील सामान्य जीवनावरही परिणाम होत आहे.