Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bengal Violence News : निवडणुकीनंतर बंगालमध्ये हिंसाचाराचा भडका; टीएमसी कार्यालयाला आग, तर कोलकाता मार्केटमध्ये तोडफोड

बंगालमधील न्युटाऊनसह राज्यातील अनेक भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. हावडा येथील जगतबल्लभपूरमधील टीएमसी कार्यालयातला आग लावण्यात आली.

  • By anuradha sagar
Updated On: May 06, 2026 | 12:29 PM
Bengal Violence News : निवडणुकीनंतर बंगालमध्ये हिंसाचाराचा भडका; टीएमसी कार्यालयाला आग, तर कोलकाता मार्केटमध्ये तोडफोड
Follow Us
Follow Us:
  • बामनघेरी भागात गस्तीवर असलेल्या पोलीस आणि केंद्रीय दलांवर गोळीबार; ३ कर्मचारी जखमी
  • एका भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या; टीएमसी समर्थकांवर संशयाची सुई
  • जलपाईगुडी, दक्षिण २४ परगणा आणि आसनसोलमध्ये भाजप-टीएमसी समर्थकांमध्ये जोरदार चकमकी आणि तोडफोड
Bengal Violence News : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वातावरण अधिकच चिघळळे आहे. निकालाच्या अवघ्या ४८ ते ७२ तासांमध्ये अनेक ठिकाणांहून हिंसाचार, चकमकी आणि तोडफोडीच्या घटना समोर येत आहेत. अशातच मंगळवारी (५ मे) संदेशखालीच्या बामनघेरी परिसरात राजकीय तणाव निर्माण झाला. समाजकंटकांनी पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांवर गोळीबार केला, ज्यात तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.

संदेशखालीतील सरबेरिया-अगारती ग्रामपंचायतीच्या बामनघेरी परिसरात (वॉर्ड क्र. १४) राजकीय तणाव निर्माण झाला. मंगळवारी रात्री उशिरा, जेव्हा केंद्रीय सुरक्षा दलांसोबत पोलिसांचे एक पथक परिसरात गस्त घालत होते, तेव्हा समाजकंटकांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. या गोळीबारानंतर परिसरात तणाव निर्माण झाला.

Maharashtra Politics : पाच राज्यांतील निकालानंतर महायुतीत खळबळ; अकार्यक्षम मंत्र्यांना मिळणार ‘डच्चू’?

अनेक भागांतून हिंसाचाराच्या घटनांची नोंद

दरम्यान, मंगळवारी, कोलकाताच्या न्यूटाऊन परिसरात एका भाजप कार्यकर्त्याला मारहाण करून त्याची हत्या केल्याचा प्रकारही उघडकीस आला. या घटनेत टीएमसी समर्थकांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. या हत्येमुळे कुटुंबीय आणि स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. परिस्थिती इतकी चिघळली की जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

बंगालमधील न्युटाऊनसह राज्यातील अनेक भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. हावडा येथील जगतबल्लभपूरमधील टीएमसी कार्यालयातला आग लावण्यात आली. त्यानंतर कोलकाताच्या हॉग मार्केट परिसरातही मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळला. जलपाईगुडी, दक्षिण २४ परगणा आणि आसनसोल यांसारख्या भागांमध्ये टीएमसी आणि भाजप समर्थकांमध्ये संघर्ष आणि जाळपोळीच्या घटना घडल्याचीही माहिती समोर आली आहे.

एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

हिंसाचाराच्या घटनांवर निवडणूक आयोगाची कठोर कारवाई

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी हिंसाचाराच्या घटनांवर कठोर भूमिका घेतली आहे. हिंसाचार किंवा तोडफोड करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांनी मुख्य सचिव, पोलीस महासंचालक (डीजीपी), कोलकाता पोलीस आयुक्त आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे महासंचालक (डीजी) यांच्यासह राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक (एसपी) आणि पोलीस अधिकाऱ्यांना सतत गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाने हे देखील स्पष्ट केले आहे की, निवडणुकीनंतर कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही. हिंसाचार आणि तोडफोड करणाऱ्यांना तात्काळ अटक केली जाईल.

 

Web Title: Violence erupts in bengal bjp worker murdered in newtown clashes reported across asansol and howrah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • crime news
  • Mamta Banarjee
  • West Bengal Election Result 2026

संबंधित बातम्या

Sambhajinagar Crime : माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर…; संभाजीनगरमध्ये विवाहितेचा छळ
1

Sambhajinagar Crime : माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर…; संभाजीनगरमध्ये विवाहितेचा छळ

Crime News : महिलेच्या कपाळावर चाकूने वार, चौघांवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
2

Crime News : महिलेच्या कपाळावर चाकूने वार, चौघांवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

Sambhajinagar News : ढाब्यावर काम करणारे बांगलादेशी जेरबंद; ‘असा’ झाला दोघांचा भांडाफोड
3

Sambhajinagar News : ढाब्यावर काम करणारे बांगलादेशी जेरबंद; ‘असा’ झाला दोघांचा भांडाफोड

फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली नागरिकांना गंडा; ‘सेल्स हेड’ने चक्क स्वतःच्या फायद्यासाठी वापरली 23 लाखांची रक्कम
4

फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली नागरिकांना गंडा; ‘सेल्स हेड’ने चक्क स्वतःच्या फायद्यासाठी वापरली 23 लाखांची रक्कम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.