विराट कोहलीकडून सचिनच्या शतकांची बरोबरी ; साऊथ आफ्रिकेसमोर ३२७ धावांचे लक्ष्य

कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर विराट कोहलीने वनडेतील 49 वे शतक ठोकले. विराट कोहलीच्या शतकानंतर स्टेडियममध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.

    क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरच्या ( Sachin Tendulkar) वनडेतील शतकांच्या विक्रमाची रनमशीन विराट कोहलीने (Virat Kohli ) बरोबरी केली आहे. वानखेडे स्टेडिअवर (wankhede stadium) श्रीलंकेविरोधात (IND vs SL) विराट कोहलीने शतक ठोकत सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली. सचिन तेंडुलकरने वनडेमध्ये 49 शतके ठोकली होती. आता या विक्रमाची विराट कोहलीने आज बरोबरी केली आहे. विराट कोहलीने यंदाच्या विश्वचषकातील दुसरे शतक झळकावले. सचिनच्या वनडे शतकांची बरोबरी केल्यानंतर बड्डे बॉय विराट कोहलीवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

    भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर एके काळी क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जायचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या फलंदाजाच्या नावावर अनेक मोठे विक्रमही नोंदवले गेले आहेत. पण भारतीय संघाचा सध्याचा स्टार फलंदाज विराट कोहलीने त्याचा वनडेतील शतकाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विराट कोहलीच्या शतकानंतर स्टेडियममध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.

    विराट कोहलीचे झंझावती शतक –

    भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने वादळी सुरुवात करुन दिली. पण एकापाठोपाठ एक दोन धक्के बसल्यानंतर विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. विराट कोहलीने मैदानावर वर्चस्व गाजवले. विराट कोहलीने श्रेयस अय्यरच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. विराट कोहलीने 119 चेंडूमध्ये शतक ठोकले. सुरुवातीच्या षटकात विराट कोहलीने संयमी फलंदाजी केली. चांगल्या चेंडूला मान देत विराट कोहलीने एकेरी दुहेरी धावसंख्या काढली. त्यानंतर वेगाने धावा केल्या. विराट कोहलीने आपल्या शतकी खेळीत 10 चौकारांचा समावेश आहे.