भारताने केला पाकिस्तानचा पराभव (फोटो- ट्विटर)
A decade of dominance continues as India book their place in the next round! 👊🇮🇳 India men's team defeated Pakistan 5–3 in a thrilling Pool D clash at the FIH Hockey World Cup Belgium & Netherlands 2026! 🏑🏆 Here are the moments from the big win! 📸🔥#DusSaalKaDabdaba… pic.twitter.com/TqyT1nKSAe — Hockey India (@TheHockeyIndia) August 19, 2026
भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानचा ५-३ दारुण पराभव केला आहे. या थरारक विजयासह भारताने पॉईंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. तर दुसऱ्या फेरीत भारताने दिमाखात प्रवेश केला आहे. तर हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. कर्णधार हरमनप्रीत आणि अभिषेकची चमकदार कामगिरी: भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि स्टार फॉरवर्ड अभिषेक यांनी प्रत्येकी २ गोल केले.
Hockey Competition: हॉकीत चंदीगड अन् मध्य प्रदेशचा बोलबाला; महाराष्ट्राला मात्र पराभवाचा धक्का
दुसऱ्या सत्रात हरमनप्रीतने पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरवरून गोल केला. पाकिस्तानकडून हन्नान शाहिदने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु अभिषेकने वैयक्तिक दुसरा गोल करत मध्यंतरापूर्वी भारताला ४-१ ने पुढे ठेवले. पाकिस्तानच्या सुफियान खानने गोल करत ही आघाडी ४-२ वर आणली.
इंग्लंडने वेल्सचा ८-२ असा पराभव केल्यामुळे भारताला पुढील फेरीत जाण्यासाठी या सामन्यात केवळ ड्रॉची गरज होती. मात्र, भारतीय संघाने विजय मिळवून पुढील फेरीतील आपले स्थान अधिक मजबूत केले. भारताने याआधी वेल्सचा ३-१ असा पराभव केला होता, तर इंग्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. पाकिस्तानविरुद्धचा हा विजय मिळवून भारताने ‘पूल डी’ मध्ये ६ पॉईंट्ससह दुसरे स्थान मिळवले.
32 वर्षांची पराभवाची परंपरा कायम! FIH Hockey मध्ये भारताचा दारुण पराभव, इंग्लंडने थेट…
तिसऱ्या डावात हार्दिक सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत भारताला ५-२ अशा मजबूत स्थितीत आणून ठेवले. चौथ्या डावात पाकिस्तानच्या हन्नान शाहिदने आपला दुसरा गोल करत आघाडी ५-३ अशी कमी केली, मात्र भारतीय बचावाने उर्वरित वेळेत पाकिस्तानचे प्रयत्न उधळून लावले आणि भारताने दणदणीत विजय प्राप्त केला.






