Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान; ‘या’ दोन नेत्यांमध्ये चुरशीची लढत

  • By Pooja Pawar
Updated On: Oct 17, 2022 | 08:38 AM
आज काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान; ‘या’ दोन नेत्यांमध्ये चुरशीची लढत
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : पराभवातून पुन्हा उभारी घेऊ पाहणाऱ्या काँग्रेस पक्षाचा (National Congress Party) नवीन अध्यक्ष कोण होणार याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून रंगली आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत यंदा गांधी घराण्यातील एका ही सदस्याने भाग घेतलेला नाही. तेव्हा १३८ वर्षाच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षात अशी निवडणूक सहाव्यांदा होत आहे.  काँग्रेस अध्यक्षपदाच्या अशा ऐतिहासिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज देशभरात पारपडणार आहे.

मतदानासाठी देशभरातील ४० केंद्रांवर ६८ बूथ स्थापन करण्यात आले असून सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडेल. काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुमारे ९८०० मतदार (राज्य प्रतिनिधी) आहेत. यंदा काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जे मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर या दोन उमेदवारांमध्ये चुरस रंगली आहे.

सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रियंका गांधी यांच्यासह सीडब्ल्यूसीचे सदस्य काँग्रेस मुख्यालयातील बूथवर मतदान करणार आहेत. तर राज्यातील ५६१ प्रदेश प्रतिनिधी आपला मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. या निवडणुकीसाठीचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश कुमार, नरेंद्र रावत, कृष्णा पुनिया हे मतपेट्या घेऊन मुंबईत आले आहेत.

या निवडणुकीत भारत जोडो यात्रेच्या शिबिरात एक बूथ तयार करण्यात आला असून तेथे राहुल गांधी आणि सुमारे ४० मतदार मतदान करणार आहेत. मल्लिकार्जुन खरगे बेंगळुरू येथील प्रदेश काँग्रेस कार्यालयात आणि शशी थरूर तिरुअनंतपुरममध्ये मतदान करणार आहेत. मतदानानंतर मतपेट्या दिल्लीत आणल्या जाणार असून पक्षाच्या मुख्यालयात १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. तसेच त्याच दिवशी निकाल देखील घोषित करण्यात येईल. काँग्रेस अध्यक्षपदासाठी तब्बल २२ वर्षांनंतर निवडणूक होत असून तब्बल २४ वर्षांनंतर पक्षाची धुरा गांधी घराण्याबाहेर जाणार असल्याने काँग्रेस पक्षासाठी ही निवडणूक सर्व दृष्टीने महत्वाची ठरणार आहे.

Web Title: Voting for congress president today a tough fight between these two leaders pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2022 | 08:38 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • delhi
  • Rahul Gandhi
  • soniya gandhi

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
3

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
4

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.