मिझोराम, छत्तीसगडमध्ये आज मतदान; पहिल्या टप्प्यात 20 जागांवर 233 उमेदवार रिंगणात

मिझोराममधील (Mizoram Election) सर्व 40 आणि छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील 20 जागांसाठी होत असलेला निवडणूक प्रचार रविवारी सायंकाळी शमल्यानंतर मंगळवारी (दि.7) दोन्ही राज्यांत मतदान होत आहे.

    रायपूर : मिझोराममधील (Mizoram Election) सर्व 40 आणि छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील 20 जागांसाठी होत असलेला निवडणूक प्रचार रविवारी सायंकाळी शमल्यानंतर मंगळवारी (दि.7) दोन्ही राज्यांत मतदान होत आहे. छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्यातील उर्वरित 70 जागांसाठी 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये नक्षलग्रस्त बस्तार विभागातील 12 आणि राजनांदगावमधील 8 जागांवर मंगळवारी मतदान होत आहे.

    पहिल्या टप्प्यात 20 जागांवर 233 उमेदवार रिंगणात असून, मुख्य लढत सत्तारूढ भाजपात आहे. पहिल्या टप्प्यात 40 लाख 78 हजार 681 मतदार 5304 मतदान केंद्रावर मताधिकार बजावतील. प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांनी महादेव अॅप सट्टेबाजीवरून मुख्यमंत्री भूपेश बघेल व काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला होता तर काँग्रेसने हमी आणि तपास यंत्रणांच्या दुरुपयोगाचा मुद्दा उपस्थित केला.

    मिझोराममध्ये 40 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार असून, 1276 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. राज्यातील 8.51.895 मतदार 174 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. राज्यात मिझो नॅशनल फ्रंट, जोरम पिपुल्स मुव्हमेंट, काँग्रेस आणि भाजपामध्ये मुख् आहे. मिझो, झोरम आणि कॉंग्रेसने सर्व 40 तर भाजपाने 23 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. आम आदमी पक्षही चार जागांवर रिंगणात असून या निवडणुकीत मणिपूरमधील हिसाचाराचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.